केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी चिंचवड च्या वाहतूकीत बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


निगडी दि .४,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि.६) पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ते एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी चिंचवड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत.

हे बदल रविवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील तसेच कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत.


बदल करण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती खालील प्रमाणे:

महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने महावीर चौकातून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.

दर्शन हॉल लिंकरोड येथून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकातून इच्छित स्थळी जातील.

रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर चौक अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास बंदी आहे. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात