दावडी ग्रामपंचायतच्या वतीने प्राचार्य अंकुश केंगारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
खेड दि. २, ( प्रतिनिधी - उत्तम खेसे) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश केंगारे हे आपल्या नियत वयोमानानुसार 31 जुलै 2023 रोजी सेवानिवृत्त झाले .त्यानिमित्त दावडी ग्रामपंचायत वतीने श्री अंकुश केंगारे यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य अंकुश केंगारे यांनी 34 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा केली. तसेच गेले तीन वर्ष दावडी विद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवा काळामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी बोर्ड निकाल यामध्ये गुणवत्ता दाखवत उत्तुंग भरारी घेतली. त्यांच्या या कार्यकर्तुत्वाबद्दल दावडी ग्रामपंचायत, पीडीसीसी बँक दावडी, स्कूल कमिटी व सर्व सेवक वृंद दावडी विद्यालय यांच्या वतीने प्राचार्य अंकुश केंगारे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्त दावडी गावच्या सरपंच माधुरीताई खेसे ,स्कूल कमिटी सदस्य सुरेश डुंबरे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राणीताई डुंबरे, माजी उपसरपंच अनिल नेटके,मा. उपसरपंच राहुल कदम, ग्रा. प. सदस्या पुष्पा होरे, मेघना ववले, संगीता मैद, दत्तात्रेय ओंबळे ,ग्रामसेवक तानाजी इसवे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विजय कानवडे, प्रा.राजेंद्र वाघ सखाराम साबळे उपस्थित होते. सत्काराला उत्तर येताना प्राचार्य अंकुश केंगारे यांनी दावडी ग्रामस्थानी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच विदयालयात झालेल्या सन्मान प्रसंगी स्कूल कमिटी सदस्य सुरेश आप्पा डुंबरे पाटील ,पर्यवेक्षक महादेव आगम प्राचार्य ,डॉ. संतोष माळी, सखाराम साबळे, दीक्षा शिंदे, समीक्षा गव्हाणे यांनी प्राचार्य अंकुश केंगारे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमानिमित्त माजी सरपंच लहू शेठ गायकवाड ,वंदना केंगारे, सुशील केंगारे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर पि.डी.सी.सी. बँक दावडी शाखेच्या वतीने शाखाप्रमुख श्री पोपटराव टाकळकर साहेब व सर्व सेवक वृंद यांच्या वतीने प्राचार्य अंकुश केंगारे यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक विलास बरबटे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा