सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २५ ऑगस्टपासून वरंधा घाट खुला

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. 23:  स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच उप विभागीय अधिकारी भोर यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहे.



भारतीय हवामान खाते यांनी अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या लाल आणि नारंगी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने भोर-महाड  मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत  बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. आता भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आले नसल्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात