निसर्ग सेवा फाउंडेशन तर्फे अक्कलकोट शहरात स्वच्छता मोहीम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



अक्कलकोट दि .२१, अक्कलकोट येथे निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आला. बस डेपो परिसरा लगत असलेल्या फुटपाथ वरील संपूर्ण काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली. यामुळे फुटपाथ मोकळी होऊन श्री तिर्थ क्षेत्र नगरीचे झालेले विद्रोपीकरण दूर करण्यात आले . तसेच मादचारी मार्गावर अस्वच्छता, सर्वत्र दुर्गंधी यामुळे नागरिकांना व स्वामी भक्तांना येता जाता त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेऊन सदर परिसर स्वच्छ करण्यात आले. यामुळे फुटपाथ वर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बालकांना चालत जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. या प्रसंगी सर्व स्वयंसेवक मोठ्ठ्या प्रमाणात उपस्थित होते.      


                   

यानंतर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले. सद्या हिंदूंचा पवित्र समजला जाणारा श्रावण महिना असल्याने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. भाविकांना स्वच्छ,सुंदर व प्रसन्न वातावरण राहावे त्या दृष्टीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले होते. निसर्ग सेवा फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमचे  भाविकांनी समाधान व्यक्त करून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद