बाप रे....! सिध्देश्वर एक्स्प्रेस मध्ये महिलेच्या पर्समधून तब्बल इतक्या किंमतीचे दागिने चोरट्यांनी केला लंपास

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई दि. १५, सिध्देश्वर एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. दि.९  ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. याबाबत संगीता राजाराम ठाकूर (रा. सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसह दि. ९ आॅगस्ट रोजी कल्याण ते मुंबई बोगी नं. ए ०३ सीट क्र १९, २१ वरुन प्रवास करत हाेते. फिर्यादीस मोहोळ येथे जाग आली असता, फिर्यादीने डोक्याखाली घेतलेली पर्स दिसून आली नाही. त्यांनी लागलीच पतीला उठवून पर्सचा शोध घेत पर्समध्ये ठेवलेल्या मोबाइलवर फोन केला असता मोबाइलचा आवाज आला. त्यानुसार शोध घेतला असता बर्थखाली पर्स सापडली. पर्समधील मोबाइल मिळाला.

मात्र त्यामध्ये ठेवलेले १ लाख ६४ हजार ४९९ रुपयांचे २५.६६० ग्रॅम मंगळसूत्र, ३१ हजार ४८५ रुपयांची ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ३७ हजार ६५४ रुपयांची ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकूण २ लाख ३३ हजार ५३८ रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात