स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ ; १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

 

पुणे दि.१०: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवार १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.


नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल.


स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी ८ वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम  यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात