राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीची नोटीस ; कारण अस्पष्ट

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे दि. १३, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे.

जयसिंगराव पाटील हे मुंबईतील मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत. दरम्यान जयंत पाटील यांच्या आणखी काही निकटवर्तीयांना देखील ईडीकडून नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांना देखील एका प्रकरणात ईडीकडून नोटीस आली होती. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

कारण अस्पष्ट - जयसिंग पाटीलांचा मुंबईमध्ये हॉटेलचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही नोटीस नेमकी कोणत्या प्रकरणात पाठवण्यात आली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा