पोस्ट्स

सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / मुस्तफा चाबरू पुणे दि.१७- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथे विविध प्रकराच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मंत्री श्री.पाटील यांच्या निर्देशानुसार हवेली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड येथे विविध दाखले जागेवर उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी श्री.पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या माध्यामातून विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपिता महत्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा श्री.पाटील यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते  प्रातिनिधीक स्

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे औरंगाबाद, दि.17 (विमाका) :-  मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या.   मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त् मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरूवात झाली. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री  हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यु पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस

सजग नागरिक घडविण्यासाठी छात्र संसद उपयुक्त- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे दि.१७-देशात सजग नागरिक घडविण्यासाठी ‘भारतीय छात्र संसद’ सारखे उपक्रम उपयुक्त ठरतील आणि या माध्यमातून विविध कायदे तयार करताना चांगली मते मांडणारे नागरिक तयार होतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेत ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड आणि राहुल कराड उपस्थित होते. श्री.पाटील म्हणाले, देशातील कायदा सर्व धर्म आणि जातींसाठी समान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना भविष्याचा विचार करून तयार केली असून त्याद्वारे प्रत्येकाला समान अधिकार देण्यात आले आहेत. राज्यघटनेतील तत्वाला अनुसरून देशातील पुरुष आणि महिलांमधील विषमता दूर करण्यासाठी कायद्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य कुटुंबातील व्यक्तीने समाजासाठी परिश्रमपूर्वक कार्य केल्यास ती उच्च पदावर जाऊ शकते आणि हेच आपल्या लोकशाहीची वैशिष्ठ्य आहे. युवकांनी छात्र संसदसारख्या उपक्रमांच्या

चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ २० दिवसात कार्यवाही होणार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / संदीप जगताप पुणे, दि.१७: पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर चांदणी चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजनांतर्गत सेवारस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गतीने कार्यवाही करत बावधन (ता.मुळशी) येथील ५ मिळकतींच्या भूसंपादनाचे निवाडे जाहीर केले असून सोमवारी या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे.  चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूमी संपादन (समन्वय) प्रवीण साळुंखे आणि विशेष भूमी संपादन अधिकारी (क्र.१६) द. दा. काळे यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करीत  २० दिवसांच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच चांदणी चौक परिसराला भेट देऊन  वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गतीने उपाययोजनांचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी २ सप्टेंबर रोजी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन या चौकात उभारण्यात येणाऱ्या बहुमजली उड्डाण

जायंटस् ग्रुप ऑफ हिरकणी मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विशाल खुर्द शिराळा : जायंटस् ग्रुप ऑफ हिरकणी मार्फत यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड व पंचायत समिती शिराळा शिक्षण विभाग यांच्या साहाय्याने 13 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मा.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते पार पडला.             जायंटस ग्रुप ऑफ हिरकणी च्या माध्यमातून शिराळा भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्रुप च्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक आ.मानसिंगराव नाईक यांनी आपल्या मनोगतातून प्रेरणा देण्याचे काम केले . शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, सामाजिक कार्यात सर्वातोपरी मदतीचे आश्वासन आ. नाईक यांनी केले जायंट्स गृप ऑफ हिरकणी च्या अध्यक्षा सविता नलावडे यांनी प्रास्ताविक केले. गृपच्या कार्यवाह आशा साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.मनिषा यादव यांनी केले . तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृपच्या खजिनदार

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / दयानंद गौडगांव               पुणे, दि. 14 : कृषीक्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. त्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.             आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शितल उगले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.             श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सूतगिरण्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहेत. काही बंद आहेत तर काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या सर्व सूतगिरण्यांबाबत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक सूतगिरणी नुसार विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या सूतगिरण्या सुरू राहतील यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन सर्वोत

'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटनतृ ; तीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत परिषदेत सकारात्मक चर्चा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी धर्मपाल कांबळे  पुणे, दि. १४: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, चित्रा वाघ, झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते.  खासदार सुळे म्हणाल्या, तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तृतीयपंथीयांच्या प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने ही परिषद महत्वाची ठरणार आहे.  चित्रा वाघ म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या बाबत आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या समुदायाचे प्रश्न आपण आपले प्रश्न म्हणून मांडणे गरजेचे आहे.  मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग तसेच तृतीयपंथीय यांचा सहभाग वाढावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे

विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम 2021-22 गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन 172 रुपये 74 पैसे अंतिम हप्ता वर्ग करणार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विशाल खुर्द शिराळा : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम 2021-22 गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन 172 रुपये 74 पैसे अंतिम हप्ता वर्ग करत आहोत. शुक्रवार (ता. 16) पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सर्व संचालक मंडळ यांचेसह कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, केंद्र शासनाचे प्रतिकूल धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारीची होणारी कुचंबना यातून अत्यंत खडतर वाटचाल सुरू आहे. तरीही ‘विश्वास’ने सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास व कामगारांच्या ताकदीवर कारखान्याने दमदार वाटचाल केली आहे. विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना ऊस दराच्या रुपाने होत आहे. 2021-22 च्या गळीत हंगामात 5 लाख 82 हजार 882 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले. त्यातून 6 लाख 57 हजार 500 क्विंटल साखर पोती ऊत्पादन झाले. कारखान्याची आधारभूत किंमत 2 हजार 972 रुपये 74 पैसे प्रतिटन आहे. पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 600 रुपये, दुसऱ्या हप्ता 200 रुपय

जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण १८ सप्टेंबर ला राजगुरूनगर येथे होणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख                  खेड : दि.१४, खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ यांच्या वतीने जिल्हा पातळीवर गुणवंत मुख्याध्यापक उपमुख्याद्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत लेखनिक, व गुणवंत सेवक,पुरस्कार सोहळा18 सप्टेंबर रोजी खेड येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यानिमित्ताने माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पदवीधर आमदार अरुण लाड, क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे शिक्षक आमदार आजगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, व शरद बुटे पाटील, पिंपरी चिंचवड शिक्षणाधिकारी संजय नाइकडे, ठाणे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, पंचायत समिती सभापती, व सदस्य जिल्हा  मुख्याध्यापक संघ अध्यक्ष व सचिव व सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.     महाराष्ट्र राज्यात प्रथमच अनेक संघटना मिळून एकच संघटना मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर अनेक कर्मचारी एकत्र येऊन खेड माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ

राष्ट्रीय बहूजन विकास महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महिला संघटक पदी उषाताई आल्हाट यांची एकमताने निवड

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दत्ता भगत पुणे : दि. 13, बालेवाडी येथे  राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाच्या नियुक्ती आणि संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. दिनांक ४/९/२०२२ रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.  त्यामध्ये सौ. उषाताई प्रकाश आल्हाट यांची राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाच्या महाराष्ट्र राज्य माहिला संघटक  पदी निवड करण्यात आली.                  यावेळी उपस्थितांमध्ये  राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचे संस्थापक / अध्यक्ष - बाळासाहेब भांडे, राज्य उपाध्यक्ष - अनिल शिंदे, राज्य कार्याध्यक्ष - विनय आल्हाट,  प्राध्यापक - अवचरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी उषाताई प्रकाश आल्हाट यांचे अभिनंदन केले.  उषा आल्हाट यांची महिला संघटना आहे. सतत महिलांसाठी ते काम करत असतात, त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की महिलांच्या अनेक समस्या, अनेक प्रश्न, अनेक अडचणी असतात. आणि त्यांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे . व इथून पुढे  महिलांच्या समस्या साठी काम करीत राहील. संस्थेच्या माध्यमातून सतत काम करेल, याही पुढे समाजातील सर्व घटकांसाठी काम करेल असं

'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /लतिफ शेख पुणे, दि. १३: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचा समारोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.  राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.  या परिषदेत ‘एलजीबीटीआयक्यू’चा अर्थ आणि फरक, व्यसायामध्ये यशस्वी झालेल्या तृतीयपंथीयांशी संवाद, तृतीयपंथीयांचे शिक्षण आणि रोजगार, आपल्या पाल्याचे तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद, तृतीयपंथीयांचे चित्रण आणि स्थान : भाषा-साहित्य-पत्रकारिता-चित्रपट, तृतीयपंथीयांचा निवारा आणि आरोग्य, तृतीयपंथीयांसाठी आम्ही काय करणार? या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जमीर कांबळे

खेड तालुक्यातील सहा गावांत लम्पी आजाराचा शिरकाव

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दत्ता भगत खेड, दि. १३, खेड तालुक्यातील सहा गावांमध्ये लम्पी आजाराचा शिरकाव मोठया प्रमाणात झाला आहे. तालुक्यातील करंजविहरे,पाईट,रोहकल,किवळे,वाळद आणि चऱ्होली येथे मोठ्या प्रमाणात आढळून आले. जिल्हा  परिषद आणि राज्य सरकारच्या दवाखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तालुक्यात मागणी होत आहे. लसीचे लागण झाल्या पासून पाच किलोमीटर अंतरावर झोन तयार करण्यात आले आहे.या परिसरात  ३० ते ३५ हजारच्या जवळपास जनावरे आहेत. या जनावरांना लसीकरणाची मोहीम पशुसंवर्धन खात्याने हाती घेतली आहे.आत्ता पर्यंत पशुसंवर्धन विभागाला सहा हजार डोस उपलब्ध झाले आहेत.अनेक शेतकऱ्यांनी स्व: खर्चाने जनावरांना लसी करण करून घेतली आहेत.पशुसंवर्धन विभागाने सर्व पुणे जिल्ह्यामध्ये लसीकरण राबविण्यात येत आहे. शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये असे आव्हान डॉक्टरांनी दिले आहे.मा. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,सातकरस्थळ मा. सरपंच अजय चव्हाण आणि वाकी बु मा सरपंच पप्पू टोपे यांनी अनेक गावांत लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती घराण्याचे वारसदार शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                                                                               प्रतिनिधी / योगेश रांजणे     पाचगणी : दि.१३,छत्रपती घराण्याचे वारसदार आणि सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पुण्याच्या जहांगिर हॅास्पिटलमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  उद्या सकाळी ९ वाजता अदालत वाडा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता अदालतवाडयापासून अंत्ययात्रा निघणार असून संगम माहूली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ रोजी झाला. सातारा शहराच्या विकासात त्यांनी मोलाची भर घातली. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.  त्यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. १९८५ ते १९९१ या कालावधीत ते सातारचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली. शहराच्या सुधारणांसाठी ते कायम आग्रही

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १४ सप्टेंबर रोजी फेरफार अदालत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / मुस्तफा चाबरू  पुणे दि. १३ :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर १४ सप्टेंबर २०२२ रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी फेरफार अदालतीच्या वेळी फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करण्याबाबतचे कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले. फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे. अदालती

रोजगार भरती मेळाव्यात ८०३ उमेदवारांची निवड

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव पुणे दि.१३: औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या ८३७ पैकी ८०३ उमेदवारांची निवड करण्यात आली. या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण ४५ आस्थापना सहभागी झाल्या होत्या.  शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता आयटीआय उत्तीर्ण तसेच इतर शाखेतील एकूण ८३७ उमेदवारांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. आस्थापनांच्या मनुष्‍यबळ विकास विभागाकडून ८३७ पैकी ८०३ विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मशिनिस्ट व संगणक या पदांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे १२१ महिला उमेदवार पैकी ९६ महिला उमेदवारांची प्रामुख्याने सुईंग टेक्नोलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, संगणक परिचालक या पदासाठी निवड करण्यात आली आहे. औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. आर. शिंपले यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास टेके व यशवंत कांबळे,  घोले रोड येथील शासकीय तांत्रिक वि

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील ; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा घेतला आढावा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                                                               प्रतिनिधी /राजू शिंगाडे    पुणे : दि. 13 : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या आता 5 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.              विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामजिक अडचणी दूर करण्यासाठी झाला पाहिजे. सामाजिक अडचणीवर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आणि समाजाप्रती सामजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा विकास आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ७० हजारावरून  आता ५ लाख करण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास दीडपट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव विद्यार्थ्यांचा खर्च राज्य श

आरिफ ईनामदार नीट परीक्षेत खेड तालुक्यातून प्रथम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क           प्रतिनिधी / लतिफ शेख                                                         खेड : खेड तालुक्यात महात्मा गांधी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक अब्दुल रहेमान इनामदार  यांचा मुलगा आरिफ ईनामदार हा नीट परिक्षेत खेड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.              आरीफ इनामदार या विद्यार्थ्यांने 720 गुणांपैकी 675 गुण मिळवून लातूर येथील मोटेगावकर क्लासमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण खेडमधील केटीइस या इंग्रजी माध्यमातून झाले असून दहावीत 92%गुण मिळाले होते. व अकरावी बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केले. बारावीत 98.5% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. 2022 च्या नीट परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांचे  वडील माध्यमिक शिक्षक आहे व आई खाजगी क्लासेस चालविते.   खेड तालुक्यात या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवून एक आदर्श घालून दिला. बारावीनंतर होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात ७०० पैकी482 एवढे गुण प्राप्त केले होते परंतु आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी या मुलाने लातूर येथे आरसीसी मोटेगावकर सरांचा क्लासला प्रवेश घेतला.

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. 12 : स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास तो अधिक लोकांपर्यत पोहचण्यास मदत होईल. त्यामुळे लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.             ‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड’ - 1 ते 13 या मोबाईल ॲपचे लोकार्पण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.             सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दर्शनिका विभागाने दुर्मिळ साहित्य मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध केले आहे याचा आनंद आहे. कारण या अॅपमुळे हे साहित्य आपल्या मोबाइलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण कितीही पुढे

अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मुस्तफा चाबरू पुणे, दि. १२: रस्ते अपघाताच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी. याद्वारे कार्यक्षेत्रात झालेल्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यातील अपघात टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पुणे शहरचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहूल श्रीरामे आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस तसेच पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम-राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर

खेड तालुक्यातील जऊळके खुर्द येथील ऋषिकेशने युपीएससी परीक्षेत यश संपादन करून निमलष्करी दलात एसीपी अधिकारी म्हणून निवड

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दत्ता भगत पुणे/खेड.दि.१२ पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अगदी खेडे गावातील जऊळके खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षण घेउन ऋषिकेश बोऱ्हाडे याने यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून त्याची निवड निमलष्करी दलात एसीपी अधिकारी म्हणून झाली. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन गावचे नाही तर तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या या गुणगौरवाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदर्श मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली येथील राजेश कांबळे ,रविंद्र मावळे,अनिल पवळे,सोपान आढाव, ज्ञानेश्वर कडलग,रामदास पवळे,,मीरा पवळे या सर्व त्याच्या वर्ग शिक्षकानी त्याचा सन्मान केला. तसेच माजी विद्यार्थी रविंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते. तसेच ऋषिकेश ने आपल्या मनोगतात शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि गरिबीची जाण ठेऊन हे यशाचे शिखर गाठले. तरूणांनी असेच यशाचे शिखर गाठावे असे तोला मोलाचे मार्गदर्शन करून समाजापुढे एक आदर्श ठेवला. ऋषिकेशचा या उज्वल यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यासप शुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ; पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोद्वारे भरणार

  प्रतिनिधी / उत्तम खेसे  पुणे : दि.१२ : - लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली.   राज्यातील पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा वेगाने प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी ज्या शेतकरी किंवा पशुपालकांचे पशुधन या आजारामुळे मृत्यू पावले आहेत त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी

वानवडी येथील पनीर कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी राजू शिंगाडे  पुणे, दि. १२ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या  मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला. कारखान्यावर छापा टाकला असता ८०० किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत १ लाख ६७ हजार ७९० रूपये किमतीचे ७९९ किलो पनीर, १ लाख २१ हजार ८०० रूपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रूपये किमतीचे २६८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ३ लाख २९ हजार २५४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा ; रिक्षात विसरलेला एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप प्रवाशास दिला परत

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / शफीक पटेल पुणे : पुणे स्टेशन येथे प्रवासी घेण्यासाठी थांबलेला असताना रिक्षा चालक मोबीन पटेल यांच्या रिक्षामध्ये प्रीतेश रांका नावाचे प्रवासी बसले व तेथून त्यांना कोंढवा येथील शांतीबन सोसायटी येथे जायचे होते. रिक्षातून उतरल्यानंतर गडबडीमध्ये प्रवासी प्रीतेश रांका हे आपल्या रिक्षामध्ये लॅपटॉप तसेच विसरले. रिक्षा चालकाने आपल्या रिक्षामध्ये प्रवाशाचे लॅपटॉप विसरले आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष श्री. शफिक भाई पटेल यांच्याशी संपर्क साधला. समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री. रमेश साठे साहेब यांच्याशी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल यांनी संपर्क साधून सदर प्रकाराबाबत माहिती दिली व सदर प्रवाशास समर्थ पोलीस स्टेशन येथे बोलावून प्रवाशाचा विसरलेला अंदाजे एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप प्रामाणिकपणे परत दिला. रिक्षा चालक मोबीन आयुब पटेल ( सध्या राहणार : मंगळवार पेठ मालधक्का चौक पुणे ) हा स्वतः दौंड तालुक्यातील गिरीम या गावाचा रहिवासी असून काही वर्षांपूर्वी परमिट घेऊन फायन

अक्कलकोट येथे बाल गोपाळ तरुण मंडळाने काढली गणरायाची भव्य मिरवणूक

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / रफिक खिस्तके   अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस लाईन बालगोपाल तरुण मंडळाच्या वतीने श्री गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान गणरायाची पूजा अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या हस्ते करण्यात आली.  यावेळी सहा पोलीस निरीक्षक, काकडे बाबा , पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध काळे, बजरंग बा. डीवाले तसेच प्रवीण लोकरे, पोलीस शंकर राठोड, फारुख बिराजदार, सिद्धराम छाय गुंडे तसेच मल्लिनाथ कलशेट्टी हवलदार, दादाराव पवार, सुनील माने, हवलदार मुल्ला, गणेश अंगुले, भाऊ कांत, सुरवसे तसेच काशिनाथ सदाफुले, धनशाम गा. वडे व एजाज मुल्ला सिद्राम, सिद्धराम घंटे अरुण राऊत, अमोल सिद्ध वाघमोडे, महादेव शिंदे, पोलीस जगदीश राठोड, इरफान शेख, रफिक शेख, इस्मान शेख, राज शेखर कोळी, श्रीकांत जवळगी, दक्षिण पोलीस स्टेशन उत्तर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस स्टॉप तसेच पोलीस कॉन्स्टेबल  वंदना पुजारी, सुरेखा कटगे, तसेच  रजनी माने, चमेली राजमाने, ज्योती सगुमळे, शारदा हिप्परगी, अनुराधा सुरवसे, वसुधा माळी, रेखा मॅडम, गीता बिराजदार, भाग्‍यश्री कोळी

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू ;अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि.११: उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्युमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे सुपुर्द झाले. या दु:खद प्रसंगात मुख्यमंत्र्यांनी केलेली तातडीची मदत नातेवाईकांसाठी दिलासा देणारी ठरली. पालघर जिल्ह्यातील काही यात्रेकरु ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरुंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३ वर्षे), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४० वर्षे), पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ वर्षे), दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय ५३ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.  अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी ता

खेड तालुक्यातील राजगुरुनगरच्या प्रांत कार्यालय ते सात नळ जोड पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / विजय कानवडे खेड दि.११  राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालय ते सात नळ जोड रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने खेडमधील नेहमीच गर्दीचा आणि वर्दळीचा रस्ता असल्यामुळे आणि वाडा रोडने महात्मा गांधी विद्यालय कचेरी रोड तहसील कार्यालय प्रांत कार्यालय एलआयसी कार्यालय असे अनेक कार्यालय असल्यामुळे नेहमीच गर्दी असते. तसेच शाळेची मुले सायकल वरून प्रवास करतात व इतर वाहनाने या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.  त्याचप्रमाणे खेड शहराच्या अंतर्गत पुलावरून प्रांत ऑफिस जवळून जाणारा सात नळ रस्त्याची अत्यंत दुरावस्था व खराब झाल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. सदरचा रस्ता हा खड्ड्यांनी भरलेला व खड्ड्यात पाणी साठलेले असल्यामुळे जाणारा येणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्या रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे. 

पुणे जिल्ह्यातील खेड येथील राजगुरूनगर शहरामध्ये अवतरले साक्षात गणराय

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दत्ता भगत   देशभरात अनंत चतुर्दशीच्या निमित्त भक्तीभावाने गणराजाला निरोप देण्यात आला.तोच उत्साह राजगुरुनगर आणि परीसरात दिसुन आला . राजगुरुनगर पोलीस स्टेशन मधील गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत प्रमुख आकर्षन ठरले ते गणपती बाप्पाची वेशभुषा साखारणारे शिरोली ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगीताई यांचे चिरंजीव अरमान युसुफ शेख या लहाणग्याने गणपती बाप्पाची वेशभुषा केली होती. एका मुस्लीम मुलाने केलेली हि वेशभुषा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. मागील अनेक वर्षे गणपती बाप्पा हा काल्पनिक कि वास्तव ह्या विषयावर अनेक पुरोगामी विचार सरणीच्या लोकांनी आपली मते मांडली . पण या निरागस लहाणग्याने साकारलेली गणेशाची वेशभुषा तालुक्यातील गणेश भक्तांना नक्किच आवडली आणि भक्तांनी मनोभावे या गणेशाचे दर्शन घेतले . सर्व राजगुरूनगर शहर भक्तमय वातावरणात रममाण झाले. तसेच खेड येथील मोती चौकातील पहिला मनाचा गणपती ची स्थापना टिळकांनच्या हातून झाली आणि त्या गणपतीची आरती करण्याचा मान या उसत्व मंडळाने लहानग्या ला दिला आणि त्यांचा मानसन्मान केला. ह्या ताच्या स्तुत्य उपक्रम राबविले म्हणून त्याचे सर्व

अक्कलकोट येथे गणरायाला भावपूर्ण निरोप ; लेसर सह डॉल्बी, पारंपारिक वाद्याचा समावेश; मिरवणुकीत महिलांचा सहभाग ; पर्यावरणपूरक विसर्जनास प्रतिसाद

इमेज
प्रतिनिधी / गजानन अर्वतकर       अक्कलकोट : अक्कलकोट शहरांमध्ये विविध गणेश मंडळाच्या गणरायाला वाजत गाजत निरोप. डॉल्बीचा दणदणाट, झांज पथक व बेंजोचा निनाद, मनोहरी लेसर शो आणि ढोल ताशांच्या कडकडाटावर ठेका धरत आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह भव्यदिव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक आरास शांततापूर्ण मिरवणूक चालली.  विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक गणेश मंडळाच्या सकाळच्या सत्रात महिला व युवतींचा मोठा सहभाग होता. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक जमत होते. रात्रीच्या सुमारास तर मुख्य रस्त्यावर अलोट गर्दी पाहावयास मिळाली मिरवणूक मार्गावर विविध संस्था व पक्षाकडून स्वागत.

अखिल जनलोक संपादक व पञकार संघटनेचे सदस्य व जनलोक वार्ता चे पाचगणीचे पत्रकार योगेश रांजणे यांचा एका व्यक्तीचा हरवलेल्या चार लाखांच्या दागिन्यांची बॅग शोधून देण्यात मोलाचा वाटा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी योगेश रांजणे   पाचगणी : दि. ९, माणसांचा विसरभोळेपणा किती महागात पडतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे  दिनांक ०९/०९/२०२२ रोजी घडलेला प्रकार तानाजी देविठ्ठल बेलोशे, गाव - रूईघर, ता. जावली, जि. सातारा सध्या रा - मुंबई, गणपती कार्यक्रमा करीता गावी आले होते. ते कार्यक्रम करून  परत मुंबईला पहाटे ५ ते ५:३० या वेळेत मुंबईला जाण्यासाठी निघाले, तेव्हा घराच्या समोर देवीचे मंदिर आहे. त्या मंदिरात दर्शन घेऊन ते परत गाडी मध्ये बसले ते गाडी मध्ये बसून जवळ पास ३ किलोमीटर गेले. तेव्हा त्यांना त्यांची पत्नी यांनी विचारले की, माझी बॅग कुठे आहे  ? मला द्या ! तेव्हा ते बोलले की, आहे गाडी मध्ये. परत २५ ते ३० किलोमीटर वर गेले. तेव्हा त्याच्या पत्नीने  त्यांना विचारले की माझी बॅग द्या , तेव्हा ते तसेच बोलेले की, आहे  डिक्कीत, परंतु ती गाडी पाचवड ते लोणावळा तेथे गेली तेव्हा ते चहा पिण्या करीता थांबली तेव्हा त्याच्या पत्नीने बॅग मागितली असताना तेव्हा बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की बॅग गाडी मध्ये नाही. तेव्हा त्याने त्याच्या आईला फोन करून झालेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांच्

राजगुरुनगर येथील संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळाचे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने जिवंत शिवराज्याभिषेक देखावा सादर ; मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे         राजगुरुनगर :  राजगुरुनगर येथील संभाजी ग्रुप राजा मित्र मंडळाने यावर्षी जिवंत शिवराज्याभिषेक देखावा सादर करून गणेश भक्तांचे मने जिंकली. कोरोना पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष गणेशोत्सव साजरा न करता आल्यामुळे व शासनाच्या निर्बंधामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जात होता. परंतु यावर्षी शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला व गणेश विसर्जन ही मोठ्या उत्साहात व ढोल ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. राजा मित्र मंडळाचे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होता व यावर्षी जिवंत शिवराज्याभिषेक सोहळा देखावा सादर केला. हा देखावा पाहण्यासाठी राजगुरुनगर शहर व तालुक्यातील आसपासच्या गणेश भक्तांनी गर्दी केली होती.  गणेश विसर्जनाच्या दिवशी राजगुरुनगर व परिसरातील मंडळाने विविध देखावे सादर करून गणरायाचे विसर्जन केले, व घरगुती गणपतीचेही मोठ्या उत्साहात व 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'  अशा घोषणा देत गणरायाचे विसर्जन करण्यात

फुरसुंगी भेकराईनगर परिसरात गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन ; भेकराईनगर येथील बालाजी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम श्री. गणेश मूर्ती दान केलेल्या भक्तांना तुळशीचे रोप भेट

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / राजू शिंगाडे       फुरसुंगी दि १०: फुरसुंगी भेकराईनगर परिसरात मोठ्या उत्साहात व वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात घरगुती व मंडळाच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. २०२०/२०२१ दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता शासनाने अनेक निर्बंध लादलेले होते परंतु यावर्षी राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवल्यामुळे पुणे जिल्ह्यात व राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला व गणेश विसर्जन ही मोठ्या हर्ष उल्हास वातावरणात पार पडले.  फुरसुंगी भेकराईनगर परिसरात बालाजी सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्ती दान करण्यासाठी विविध ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे व बालाजी सेवा प्रतिष्ठान तर्फे पाण्याच्या हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मूर्ती व निर्माल्य दान करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्यासाठी हा उपक्रम बालाजी सेवा प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आला होता. पापडे वस्ती , ढमाळवाडी, गंगानगर कॅनॉल जवळ, हरपळे वस्ती कॅनॉल जवळ, भेकराईनगर शिवशक्ती चौकात अशा विविध ठिकाणी बालाजी सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्ती दान करण्याची व लाडक्या बाप्पाला

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी ; आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत- मुख्यमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ९: येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर..." या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. याठिकाणी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडपातून राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्

निमगाव दावडीत खंडोबा मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /दत्ता भगत पुणे/खेड दि.८ :  श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे पूर्वीची कुलदैवत खंडोबा मूर्ती भग्न झाली होती. खेड तालुक्याचे  आमदार दिलीप अण्णा मोहिते ,मोहिते परिवार खंडोबा देवस्थान ट्रस्ट व निमगाव खंडोबा ग्रामस्थांनी नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा  निर्णय घेतला. मंगळवार दि.०६ते गुरुवार दि.०८ अशा तीन दिवसात वेगवेगळे धार्मिक विधी,होमहवन अशा धार्मिक वातावरणात  प्रतिष्ठापना करण्यात आली.   तसेच जुन्या मूर्तीचा उत्थापन विधी अकोर होम आणिदुसऱ्या दिवशी  नवीन मूर्तीचीमिरवणूक ,जलादीवस, धान्य निवास,पुण्याहवान आणि संकल्प हवनारंब असे वेगवेगळे कार्यक्रम झाले. सकाळी होमहवन, मुख्यमुर्ती ची प्राणप्रतिष्ठा, पर्णविधी,महा आरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम झाला.पूर्वीच्या काळात खंडोबारायाची मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मंदिरातिल आतील भाग आणि परिसरातील  १६९१ मध्ये दिपमाळा उभारण्यात आलेल्या होत्या. बडोद्याचे सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांनी मंदिर तटबंदी बांधली होती. तसेच जुनी मूर्ती माती,चुना,शिसम आणि वेग वेगळी द्रव्ये वापरून तयार करण्यात आली होती. नवीन मूर

संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित, लंपी स्कीनला रोखण्यासाठी शासनाचे पाऊल ; अधिसूचनेचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / राजू शिंगाडे पुणे दि.९: जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा  वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे  नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.  शासनाने  ८ सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. लंपी चर्म रोगाचा  प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यामध्ये ८ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.  गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणार

कृषी निविष्ठा विक्री परवाना नूतनीकरणासाठी विक्रेत्यांना निविष्ठांबाबत अभ्यासक्रम बंधनकारक

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे, दि. ८: कृषी विषयक पदवी किंवा पदविका शैक्षणिक अर्हता नसलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निविष्ठांबाबतचे अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही, असे आत्माचे प्रकल्प संचालक आर. डी. साबळे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच कृषी निविष्ठा विक्रेत्याकडे कृषी विषयक पदवी  किंवा पदविका शैक्षणिक अर्हता नाही. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनानुसार अशा विक्रेत्यांनी वेळेत ३ अभ्यासक्रमापैकी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. सर्व परवाने असून शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्याकरिता कृषी पदविका अभ्यासक्रम (‘देसी’ अर्थात ‘डीएईएसआय’- डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्टें्यशन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स) पूर्ण करणे अनिवार्य आहे. फक्त खताचा परवाना आहे अशा परवानाधारकांनी केवळ ‘सीसीआयएनएम- सर्टिफिकेट कोर्स ऑन इंटिग्रेटेड न्युट्रिएन्ट मॅनेजमेंट फॉर फर्टिलायझर डीलर्स’ अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. फक्त किटकनाशकांचा परवाना आहे अशांन

लम्पी त्वचा रोगासंदर्भात बाधित व निगराणी क्षेत्र घोषित

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे, दि. ८: जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीऐंदी व भरतगांव, जुन्नर तालुक्यातील मौजे मांजरेवाडी (खोडद), शिरुर तालुक्यातील मौजे गोलेगाव आणि खेड तालुक्यातील मौजे करंजविहिरे या गावांमध्ये जनावरांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग झाला असल्याने प्राण्यांच्या संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे. प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नियम १२ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन वरील पाचही गावापासून १० किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये बाधित व निगराणी क्षेत्रामधील जनावरांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आली आहे. बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.७: कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागिर घडविणारी योजना आहे. देशपातळीवरील आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजीत करण्यात आला असल्याने, या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. आस्थापनांनी भरती मेळाव्याकरीता https://www.apprenticeshipindia.gov.in >> Apprenticeship  Mela किंवा https://dgt.gov.in/appmela2022  या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां) यशवंत कांबळे, विकास टेके, तसेच मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि. ७: पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून २२ सप्टेंबरर्पंत हे निर्बंध राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता अमलात असून १८ सप्टेंबरला मतदान तर १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याची तारीख २२ सप्टेंबर अशी असून या तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.  २२ सप्टेंबरपर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व