फुरसुंगी भेकराईनगर परिसरात गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन ; भेकराईनगर येथील बालाजी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम श्री. गणेश मूर्ती दान केलेल्या भक्तांना तुळशीचे रोप भेट

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी  / राजू शिंगाडे      



फुरसुंगी दि १०: फुरसुंगी भेकराईनगर परिसरात मोठ्या उत्साहात व वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात घरगुती व मंडळाच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. २०२०/२०२१ दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता शासनाने अनेक निर्बंध लादलेले होते परंतु यावर्षी राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवल्यामुळे पुणे जिल्ह्यात व राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला व गणेश विसर्जन ही मोठ्या हर्ष उल्हास वातावरणात पार पडले.



 फुरसुंगी भेकराईनगर परिसरात बालाजी सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्ती दान करण्यासाठी विविध ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे व बालाजी सेवा प्रतिष्ठान तर्फे पाण्याच्या हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मूर्ती व निर्माल्य दान करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्यासाठी हा उपक्रम बालाजी सेवा प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आला होता. पापडे वस्ती , ढमाळवाडी, गंगानगर कॅनॉल जवळ, हरपळे वस्ती कॅनॉल जवळ, भेकराईनगर शिवशक्ती चौकात अशा विविध ठिकाणी बालाजी सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्ती दान करण्याची व लाडक्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी पाण्याच्या हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. बालाजी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संजय हरपळे व सुधाताई हरपळे यांच्यातर्फे गणेश भक्तांना तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करीत होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपक्रम सुरू होता. दहा दिवस विराजमान असलेल्या श्री. लाडक्या गणरायाला निरोप देताना मात्र फक्त भावुक झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात