अखिल जनलोक संपादक व पञकार संघटनेचे सदस्य व जनलोक वार्ता चे पाचगणीचे पत्रकार योगेश रांजणे यांचा एका व्यक्तीचा हरवलेल्या चार लाखांच्या दागिन्यांची बॅग शोधून देण्यात मोलाचा वाटा
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी योगेश रांजणे
पाचगणी : दि. ९, माणसांचा विसरभोळेपणा किती महागात पडतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिनांक ०९/०९/२०२२ रोजी घडलेला प्रकार तानाजी देविठ्ठल बेलोशे, गाव - रूईघर, ता. जावली, जि. सातारा सध्या रा - मुंबई, गणपती कार्यक्रमा करीता गावी आले होते. ते कार्यक्रम करून परत मुंबईला पहाटे ५ ते ५:३० या वेळेत मुंबईला जाण्यासाठी निघाले, तेव्हा घराच्या समोर देवीचे मंदिर आहे. त्या मंदिरात दर्शन घेऊन ते परत गाडी मध्ये बसले ते गाडी मध्ये बसून जवळ पास ३ किलोमीटर गेले. तेव्हा त्यांना त्यांची पत्नी यांनी विचारले की, माझी बॅग कुठे आहे ? मला द्या ! तेव्हा ते बोलले की, आहे गाडी मध्ये. परत २५ ते ३० किलोमीटर वर गेले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना विचारले की माझी बॅग द्या , तेव्हा ते तसेच बोलेले की, आहे डिक्कीत, परंतु ती गाडी पाचवड ते लोणावळा तेथे गेली तेव्हा ते चहा पिण्या करीता थांबली तेव्हा त्याच्या पत्नीने बॅग मागितली असताना तेव्हा बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की बॅग गाडी मध्ये नाही. तेव्हा त्याने त्याच्या आईला फोन करून झालेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांच्या आईने जनलोक वाताचे पत्रकार योगेश रांजणे यांना ही माहिती दिली. पत्रकार रांजणे यांनी त्यांच्या आई सोबत बॅगेचा मंदिरा जवळ शोध सुरू केला. हा प्रकार घडला त्याच्या मधला कलावधी जवळ पास तिन तासाहून उलटून गेला होता. त्या वेळी गावातील काही युवकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला असताना रिकामी बॅग सापडली. त्याच वेळी ग्रामस्थांच्या मदतीने व पोलीसच्या सहकाऱ्याने ज्यांचे जिन्नस हरवले होते त्यांची आई गावातील काही युवक व पत्रकार योगेश रांजणे यांच्या सहकार्याने शोध घेतला जात होता. २४ तासाच्या नंतर हे हरवलेले सोन्याचे दागिने अखेर मिळवून आले. यावेळी जनलोक वाताचे पत्रकार योगेश रांजणे यांनी ती बॅग सापडण्यासाठी तानाजी बेलोशे यांच्या आईला मदत करून खूप मोठे सहकार्य केले.
जनलोक वार्ता एक विश्वास
उत्तर द्याहटवा