स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १४ सप्टेंबर रोजी फेरफार अदालत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / मुस्तफा चाबरू 

पुणे दि. १३ :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर १४ सप्टेंबर २०२२ रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 


नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी फेरफार अदालतीच्या वेळी फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करण्याबाबतचे कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.


फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.


अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात