खेड तालुक्यातील जऊळके खुर्द येथील ऋषिकेशने युपीएससी परीक्षेत यश संपादन करून निमलष्करी दलात एसीपी अधिकारी म्हणून निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / दत्ता भगत



पुणे/खेड.दि.१२ पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अगदी खेडे गावातील जऊळके खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षण घेउन ऋषिकेश बोऱ्हाडे याने यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून त्याची निवड निमलष्करी दलात एसीपी अधिकारी म्हणून झाली. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन गावचे नाही तर तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या या गुणगौरवाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदर्श मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली येथील राजेश कांबळे ,रविंद्र मावळे,अनिल पवळे,सोपान आढाव, ज्ञानेश्वर कडलग,रामदास पवळे,,मीरा पवळे या सर्व त्याच्या वर्ग शिक्षकानी त्याचा सन्मान केला. तसेच माजी विद्यार्थी रविंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते. तसेच ऋषिकेश ने आपल्या मनोगतात शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि गरिबीची जाण ठेऊन हे यशाचे शिखर गाठले. तरूणांनी असेच यशाचे शिखर गाठावे असे तोला मोलाचे मार्गदर्शन करून समाजापुढे एक आदर्श ठेवला. ऋषिकेशचा या उज्वल यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात