निमगाव दावडीत खंडोबा मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी /दत्ता भगत
पुणे/खेड दि.८ : श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे पूर्वीची कुलदैवत खंडोबा मूर्ती भग्न झाली होती. खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते ,मोहिते परिवार खंडोबा देवस्थान ट्रस्ट व निमगाव खंडोबा ग्रामस्थांनी नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा निर्णय घेतला. मंगळवार दि.०६ते गुरुवार दि.०८ अशा तीन दिवसात वेगवेगळे धार्मिक विधी,होमहवन अशा धार्मिक वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
तसेच जुन्या मूर्तीचा उत्थापन विधी अकोर होम आणिदुसऱ्या दिवशी नवीन मूर्तीचीमिरवणूक ,जलादीवस,
धान्य निवास,पुण्याहवान आणि संकल्प हवनारंब असे वेगवेगळे कार्यक्रम झाले. सकाळी होमहवन, मुख्यमुर्ती ची प्राणप्रतिष्ठा, पर्णविधी,महा आरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम झाला.पूर्वीच्या काळात खंडोबारायाची मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मंदिरातिल आतील भाग आणि परिसरातील
१६९१ मध्ये दिपमाळा उभारण्यात आलेल्या होत्या. बडोद्याचे सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांनी मंदिर तटबंदी बांधली होती. तसेच जुनी मूर्ती माती,चुना,शिसम आणि वेग वेगळी द्रव्ये वापरून तयार करण्यात आली होती. नवीन मूर्ती राजस्थान येथून सात टन स्टोन आणून अडीच टनाची नारायण गाव येथे साकारण्यात अली.सदर मूर्ती भव्यदिव्य असल्याने जुन्नर तालुक्यातील मांजरेवाडी येथील मूर्तिकार वर्गाला मुख्य मंदिरात नेण्याच्या कमी जवळपास चोवीस तास वेळ लागला. खेड तालुक्यातून नवे तर पंचक्रोशीतील अनेक भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी अकरा जोडप्यांनच्या उपस्थितीत शाही शोहळ्यात अभिषेक करण्यात आला.या धार्मिक विधीच्या कार्यक्रमाला आमदार दिलीप अण्णा मोहित,मा.जिल्हा परिषद सदस्यां सुरेखाताई मोहिते,साहेब राव मोहित,राजेंद्र मोहिते,प्रतीक मोहिते, मयूर मोहिते, रोहन मोहिते, प्रथमेश मोहिते, संजय मोहिते, अरुण चांभारे, कांचन ढमाले, राजकुमार राऊत,पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील,बाहेरील देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बबनराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष विलास मांजरे, मा सभापती सुरेश शिंदे,रमेश राळे, शांताराम चव्हाण अशोकदादा राक्षे,कैलास लिंभोरे, तसेच सुभाष होले,अमोल पानमंद, बाळासाहेब सांडभोर, गणेश सांडभोर, अनिल राक्षे,रामहरी औटी,जयसिंग मांजरे,राष्ट्रवादी चे खेड तालुका प्रवक्ते उमेश गाडे,महेंद्र काळे,आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या धार्मिक विधीचे होमहवन तळेगाव स्टेशन येथील काका अविनाश कुलकर्णी, प्रसाद बेदरकर आणि ब्राम्हण वृदानी केले. विश्वस्त पुजारी ,बाळासाहेब भगत,योगेश गुरव,भगवान गुरव,दत्तात्रय गुरव,बाबासाहेब भगत,दत्ता भगत,हभप बाळासाहेब भगत,अर्जुनमहाराज भगत,मोहन भगत,डेप्युटी सरपंच दिलीप भगत सर्वच भगत आणि गुरव उपस्थित होते. मंदिरातील सर्व सजावट गुलाबराव सातकर व दुरापे यांनी केली. अगदी भक्तिमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यामुळे सर्व भाविकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा