आरिफ ईनामदार नीट परीक्षेत खेड तालुक्यातून प्रथम
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / लतिफ शेख
खेड : खेड तालुक्यात महात्मा गांधी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक अब्दुल रहेमान इनामदार यांचा मुलगा आरिफ ईनामदार हा नीट परिक्षेत खेड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आरीफ इनामदार या विद्यार्थ्यांने 720 गुणांपैकी 675 गुण मिळवून लातूर येथील मोटेगावकर क्लासमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण खेडमधील केटीइस या इंग्रजी माध्यमातून झाले असून दहावीत 92%गुण मिळाले होते. व अकरावी बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केले. बारावीत 98.5% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. 2022 च्या नीट परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांचे वडील माध्यमिक शिक्षक आहे व आई खाजगी क्लासेस चालविते.
खेड तालुक्यात या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवून एक आदर्श घालून दिला.
बारावीनंतर होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात ७०० पैकी482 एवढे गुण प्राप्त केले होते परंतु आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी या मुलाने लातूर येथे आरसीसी मोटेगावकर सरांचा क्लासला प्रवेश घेतला. आणि दुसऱ्या प्रयत्नात नीट च्या परीक्षेत 675 गुण मिळवूनआपले डॉक्टरकी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यश मिळवले.
आरिफ चे वडीलमहात्मा गांधी विद्यालयामध्ये फिजिक्स विषयाचे अध्यापनाचे काम करतात. व आई राजगुरुनगर शहरात इनामदार क्लासेस चालविते. नीट च्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त करून स्वतःचे व आई-वडिलांचे स्वप्न आरिफ ने पूर्ण केले.
भारतामधील मेडिकलचे सरकारी कॉलेज दिल्ली येथील एम्स कॉलेज तसेच मुंबई जेजे मेडिकल कॉलेज व पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज किंवा ऑल इंडियातील कोणत्याही सरकारी कॉलेजमध्ये आरीफचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्याचा मानस आहे. महात्मा गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच संस्था प्रमुख व खेड तालुक्यातील तमाम शिक्षक यांनी आरिफचे कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा