खेड तालुक्यातील राजगुरुनगरच्या प्रांत कार्यालय ते सात नळ जोड पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी / विजय कानवडे



खेड दि.११  राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालय ते सात नळ जोड रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने खेडमधील नेहमीच गर्दीचा आणि वर्दळीचा रस्ता असल्यामुळे आणि वाडा रोडने महात्मा गांधी विद्यालय कचेरी रोड तहसील कार्यालय प्रांत कार्यालय एलआयसी कार्यालय असे अनेक कार्यालय असल्यामुळे नेहमीच गर्दी असते. तसेच शाळेची मुले सायकल वरून प्रवास करतात व इतर वाहनाने या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

 त्याचप्रमाणे खेड शहराच्या अंतर्गत पुलावरून प्रांत ऑफिस जवळून जाणारा सात नळ रस्त्याची अत्यंत दुरावस्था व खराब झाल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. सदरचा रस्ता हा खड्ड्यांनी भरलेला व खड्ड्यात पाणी साठलेले असल्यामुळे जाणारा येणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्या रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात