अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी :दत्ता भगत खेड दि.११, एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षेनुवर्षे काम करणारे अंगणवाडी कर्मचा-यांनी त्यांच्या वेतनात वाढ देण्यात तसेच सुप्रिम कोर्टाचा निर्णयनुसार ग्रॅच्युईटीची रक्कम व पेन्शन देणे योजनेच्या कामासाठी मोबाईल देणे, लाभार्थ्यांच्या दरात वाढ करणे या व इतर त्यांचे प्रश्न व मागण्या मान्य करावे व थकित टी.ए.डी.ए. व आहाराचे थकित पैसे देण्यात यावे. या मागणीसाठी देशाच्या घटनेने त्यांना दिलेले अधिकारानुसार त्यांनी दि. ४.१२.२०२३ पासुन त्यांनी संपावर गेल्या आहे. संपावर जाण्याचा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांच्या मागण्या शासनाने व आपले कार्यालय मान्य करीत नाही, तर संपावर असलेल्या महिलांना कामावरून कमी करण्याची नोटिस दिले आहे. परिणामी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे. आम्हाला बेकायदेशीर नोटिस देऊन आम्हाला न्याय न देण्याचा आपल्या प्रकल्प कार्यालयाकडून केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी व धमकी, व नोकरीतून कमी करण्याच्या नोटिसची होळी करण्याकरीता व शासन प्रशासनाने अंगणवाडी कर्मचा- यांच्या मागण्या त्वरीत मान्य करण्या