पवनामाई पुन्हा फेसाळली ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पवना नदीची दुर्दशा
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
निगडी दि.११, गेल्या अनेक दिवसांपासून सतत पवना नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जातात. थेरगांव येथील केजुबाई बोटिंग क्लब च्या परिसरातील हा दृश्य आहे.
याआधी सुध्दा अनेक वेळा पवना नदीपात्रात दूषित पाण्यामुळे कित्येक सामाजिक संस्थाने आवाज उठवला होता. तसेच अनेक वेळा माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. तरीदेखील प्रशासन या नद्या दूषित करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केजुबाई बोटिंग क्लबला दररोज शेकडो पर्यटक भेट देत असतात. अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात स्वच्छता असण्याकडे प्रशासनाचे लक्ष असणे आवश्यक आहे. हा प्रकार असाच चालू राहीला तर येण्याऱ्या काळात पवना नदीची केमिकल नदीत रुपांतर होईल अशी भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा