जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० नोव्हेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. १७ : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे  सोमवार  २० नोव्हेंबर  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 


महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाकरिता करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज संबधितांनी दोन प्रतीत करावे. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असावे. अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या १५  दिवस अगोदर पाठवावे. अर्ज सादर केल्यानंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अर्जासेाबत जोडलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. 


न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमून्यात नसणारे, आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबींचे अर्ज, तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरूपात नसतील तर अशी प्रकरणे महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात