पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील महापालिकांच्या जाहीर केलेल्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात प्रथम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे (प्रतिनिधी) दि.९,  पॉलिसी रीसर्च ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील  महापालिकांच्या जाहीर केलेल्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी-चिंचवड  महापालिका राज्यात प्रथम आली आहे.  मुंबई महापालिका दुसऱ्या कोल्हापूर महापालिका तिसऱ्या स्थानी आहे.



सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या प्रमुख तीन निकषांवर ई गव्हर्नन्स निर्देशांक तयार करण्यात आला.  अधिकृत वेबसाईट, मोबाइल अप, सोशल मीडियाचा उपयोग करण्यात आला. उपलब्धता निकषावर पुणे आणि कोल्हापूर, पिंपरी चिंचवड आणि मुंबई, कल्याण डोंबिवली, पारदर्शकता या निकषावर पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर, पुणे, सेवा निकषावर पिंपरी-चिंचवड, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या महापालिका सर्वोत्तम ठरल्या. वेबसाईट या माध्यमात पिंपरी-चिंचवड, मुंबई, अमरावती, मोबाइल उपयोजन माध्यमात कोल्हापूर आणि पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिका सर्वोत्तम ठरल्या.

अभ्यासादरम्यान काही महापालिकांची वेबसाईट बंद दिसत होती, त्याचे स्पष्टीकरण कुठेही आढळले नाही. वेबसाईटवरील माहिती अद्ययावत नसणे, संपर्कासाठीचे ईमेल, मोबाइल क्रमांक चुकीचे आढळले. अनेक महापालिकांनी अधिकृत सरकारी डोमेन वापरलेले नाही, अशी माहिती अहवालात देण्यात  आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात