मराठी लोकशाही वृत्तवाहीनी ३० दिवस बंद ठेवण्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे आदेश ; संपादक कमलेश सुतार यांची फेसबुक पोस्ट द्वारे माहिती

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे दि.९,  केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने लोकशाही मराठी वृत्तवाहिनी 9 जानेवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद करण्याचा आदेश दिला आहे. लोकशाही मराठी वाहिनीच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणावर स्पष्ट मत मांडले जात होते. लोकांपर्यंत सत्य जावे असा या वाहिनीचा प्रयत्न होता. अभिव्यक्तीचा घटनात्मक अधिकार हुकूमशाही पद्धतीने केंद्र सरकारने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे.


या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, हा घटनाद्रोह, लोकशाहीद्रोह आहे.केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार व त्यांचे सर्व पत्रकार यांच्या समवेत आम्ही लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी व लोकशाहीचे सक्षमीकरण व्हावे यासाठी खांद्याला खांदा लावून रस्त्यावरचा लढा आम्ही लढू.

Lok शाही मराठी वृत्तवाहीनीचे संपादक कमलेश सुतार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, लोकशाही मराठीचा परवाना पुढील 30 दिवस निलंबित ! 30 दिवस चॅनेलचे प्रसारण बंद करण्याचे आदेश! #लढेंगे #जितेंगे

दरम्यान, यापूर्वीही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील बातम्या दाखविल्यानंतर तीन दिवस वाहिनी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने स्थगिती उठविली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात