पश्चिम महाराष्ट्रात कुठेही विज यंत्रणा बिघडलेली दिसल्यास कळवा या व्हाट्सअप नंबरवर ; महावितरणाकडून आवाहन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे ( प्रतिनिधी ) : पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉट्सॲप द्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी 7875440455, कोल्हापूर- 7875769103, सांगली- 7875769449 आणि सातारा जिल्ह्यासाठी 7875768554 हा व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या सर्व क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सॲप द्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सॲप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच 24 तास सुरू असणाऱ्या 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा