विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता ओळखून त्या विकसित करण्याची गरज - प्राचार्य पांडुरंग गाडीलकर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी - दत्ता भगत


शिरूर दि.१० , विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता ओळखून त्यांचा योग्य पद्धतीने विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पांडुरंग गाडीलकर यांनी श्री पद्ममनी जैन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या २२व्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.अतिशय जल्लोशात साज-या झालेल्या या कार्यक्रमात नर्सरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.


 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर उपस्थित होते.शालेय जीवनातच मुलांच्यामध्ये असलेली वेगवेगळी कौशल्य ओळखून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ती विकसित करण्याची गरज आहे.आधुनिक जीवनशैलीत आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाच्या टप्प्यावर शिक्षकांनी सहशालेय उपक्रम यशस्वीपणे राबवण्याची गरज देखील त्यांनी यावेळी सांगितली. 

पद्ममनी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांचे विशेष कौतुक यावेळी प्राचार्य गाडीलकर यांनी केले शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या तनुष्का सोमनाथ गावडे हीचा तर गणितात ९९ मार्क्स मिळविल्याने कुणाल बाळासाहेब पिंगळे याचा तर स्कॉलरशिपमध्ये संचीता भरत डफळ, जी.के.ओलंपियाड मध्ये वेदांत भाऊ जगताप,रितेश संतोष नऱ्हे  व सुमेध संतोष जाधव यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.शाळेचा वर्षभराचा यशाचा सारांश मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी सर्वांसमोर मांडला.हीना तांबोळी यांना यावर्षीचा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन तर गणितामध्ये उत्कृष्ट रिझल्ट लागल्याबद्दल अश्विनी पावसे यांना सन्मानित करण्यात आले.सौ.सुरेखा वाईकर यांना जिल्हास्तरीय आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार तर जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून सन्मान करण्यात आला.या वर्षी पासून धरमचंद बाफना यांच्याकडून स्टूडंट ऑफ द ईयर हा नवीन उपक्रम घोषित करण्यात आला व तो श्रावणी कांचन थिटे हिला प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्री पद्ममनी जैन श्वेतांबर तीर्थ पेढीचे  सभासद व श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष हर्षद गांधी,सचिव सुनील राठोड तसेच सदस्य जयेश शहा,केतन शहा,भूषण गांधी,गिरीष शहा व पाबळगावचे सरपंच सचिन वाबळे,शिक्षक पालक संघाच्या सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गायकवाड व रेखा चौधरी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात