पोस्ट्स

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख रुपये नुकसान भरपाई

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३१: पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ३३  टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे. माहे सप्टेंबर ते माहे ऑक्टोबर २०२२  मध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे. भोर तालुका - बाधित गावे ७८, शेतकरी ५२३, बाधित क्षेत्र १६५.६६ हेक्टर, नुकसान भरपाई - २३ लाख १० हजार. वेल्हा तालुका- बाधित गावे २, शेतकरी ११,  क्षेत्र १.२१  हेक्टर,  नुकसान भरपाई-  ३९ हजार रुपये, मावळ - बाधित गावे ७, शेतकरी ११४, क्षेत्र २४  हेक्टर,  नुकसान भरपाई- ३ लाख २६ हजार. हवेली- बाधित गावे १०४, शेतकरी ७ हजार ४९०, क्षेत्र ३१४६.१९ हेक्टर, नुकसान भरपाई- ८ कोटी ३३ लाख २ हजार, खेड- बाधित गावे ३४, शेतकरी १ हजार ९४७, क्षेत्र १०८१.४१ हे

अपर कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयाचे स्थलांतर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.३१: अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग आणि कामगार उप आयुक्त पुणे जिल्हा या शिवाजीनगर, पुणे येथील कार्यालयाचे स्थलांतर शक्ती चेंबर्स, स. नं. ७७/१, दुसरा, तिसरा व चौथा मजला, संगमवाडी, पुणे-४११००३ येथे करण्यात आले आहे, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र ब. पोळ यांनी दिली आहे.  अपर कामगार आयुक्त व कामगार उप आयुक्त या दोन्ही कार्यालयाचे कामकाज १ एप्रिल पासून नवीन पत्त्यावर नियमितपणे सुरु होणार असल्याचेही  त्यांनी कळवले आहे. 

‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव’ १ एप्रिलपासून

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.३१: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव २०२३’ चे गुलटेकडी मार्केटयार्ड येथे पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत १ एप्रिलपासून आयोजन करण्यात येणार आहे.   कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’अंतर्गत गु*लटेकडी मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येत आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामिण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असणार आहे. आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे करण्यात येते. छाननीनंतर उत्पादकांना महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात.  यावर्षी सुमारे

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. ३१: एप्रिल २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ आणि ६ एप्रिल रोजी खेड, १० आणि ११ एप्रिल रोजी मंचर, १७ आणि १८ एप्रिल रोजी जुन्नर, २४ आणि २५ एप्रिल रोजी वडगाव मावळ आणि २७ एप्रिल रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकारांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढूरेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचे आश्वासन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  दिल्ली (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षांपासून राज्य आणि देशातील अधिस्वीकृतीधारक असलेल्या पत्रकारांची रेल्वेमध्ये मिळणारी अर्धा टक्के सवलत काहीही कारण नसताना रेल्वे विभागाने बंद केली. ही बंद केलेली सवलत तातडीने सुरू करावी, यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय शिष्टमंडळाने केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. दानवे यांनी या प्रश्नासंदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊ, अशी माहिती केंद्रीय शिष्टमंडळाला दिली. कोविडच्या काळामध्ये रेल्वेने अनेक प्रवासी सवलती बंद केल्या. महाराष्ट्र राज्यामधील साडेतीन हजार आणि देशामधील अडीच लाखांवून अधिक पत्रकार अधिस्वीकृती धारक आहेत. ते अधिस्वीकृती असणाऱ्या पत्रकारांच्या अर्धेतिकीट योजनेचे लाभधारक आहेत. त्यांनाही याचा फटका बसला, त्यांची सवलत बंद करण्यात आली. घरापासून दूर जाऊन रिपोर्टिंग करणे, शहरांमधल्या असलेल्या पत्रकारांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गावी जाणे, मुलांच्या शिक्षणा संदर्भामध्ये भेटी घेण्यासाठी ये- जा करणे, आजारासंदर्भामध्ये प्रवास करणे, या सगळ्या प्रवासाच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी अधिस्वीकृ

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / लतिफ शेख  बारामती दि.३०,   पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके, पुणे शहर व पुणे विभाग येथील सर्व माध्यमिक व इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षकांना खेळाचे अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी बारामती येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. बारामती क्रीडा संकुल येथे 27 मार्च ते तीन एप्रिल पर्यंतया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे  उद्‌घाटन प्रंसगी राज्यस्तरिय क्रीडा मार्गदर्शक महेश चावले, व मास्टर ट्रेनर म्हणून काम करणारे अशोक देवकर , किरण झुंरगे, विश्वनाथ पाटोळे , लतिफ शेख , जालिंदर आवारी , व इंदापूरचे शरद झोळ , तसेच पुणे जिल्ह्यातील विविध प्रशालेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते . प्रशिक्षण वर्गामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून प्रथम योगा व झुंबा यांनी सुरुवात होऊन नेट बोल, थ्रो बॉल , कबड्डी , लॉग टेनिस , मैदानी खेळ, हॉलीबॉल, तलवारबाजी , अशा विविध खेळाचे अद्ययावत ज्ञान क्रीडा शिक्षकांना देण्यात  येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा प्रकारचा उपक्रम राबविण्य

कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि. ३०: कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे, मात्र निवडून येणाऱ्या  अशा सदस्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज करावा व अर्जासोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमीत केलेला नमुना १५ अ मधील प्रमाणपत्र सादर करावे. राखीव प्रवर्गातील व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील याबाबतचे विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करावे.  निवडून आल्याच्या दिनांकानंतर बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवाराची  निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरेल. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया २७ मार्च २०२३ पासू

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि. 30 : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक  देत आहोत.  अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत  त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.                मंत्रालयात पार पडलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.              मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात  १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी,अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती

खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २९ : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.  यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अशोक पवार, माधुरी मिसाळ, रवींद्र धंगेकर, राहुल कुल, श्रीकांत भारतीय यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या कुटुंबातले घटक, अजातशत्रू खासदार गिरीश बापट सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. ते सर्वसामान्यांचे नेते होते. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपला माणूस वाटत होते. अनेक आंदोलनातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. नगरसेवक, महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, पाचवेळा विधानसभेवर आमदार आणि त्यानं

रस्त्यावरील बालकांसाठी पथदर्शी फिरते पथक स्थापन होणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २९  : रस्त्यावरील बालकांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ‘पथदर्शी फिरते पथक’ या प्रकल्पास केंद्र शासनाने नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत मान्यता दिलेली आहे. पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.  पथदर्शी फिरते पथक हा प्रकल्प पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, मुंबई शहर व नागपूर या ६  जिल्ह्यामध्ये ६  महिन्याकरीता प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहेत.  प्रकल्पास केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च बाल न्याय निधीमधून भागविण्यात येणार आहे.  प्रकल्पासाठी २५ आसनी बस/व्हॅन साठी एक समुपदेशक, शिक्षिका/शिक्षक, वाहनचालक, काळजीवाहक अशा ४ कर्मचाऱ्यांची एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही बस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असेल अशा गर्दीच्या ठिकाणी फिरेल. पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी इच्छूक स्वयंसेवी संस्थांनी ७ दिवसाच्या आत

खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन ; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.  मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. को

वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित ; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१: पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१: पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केटी’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि उपलब्ध असलेला आकर्षक नोंदणी क्रमांक सुलभतेने तो मिळावा यासाठी ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी २३ मार्च  रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी २४ मार्च  रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वा. विहित नमुन्यात

‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ वितरण कार्यक्रम २६ मार्च रोजी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१: राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या  २०१८ व २०१९ यावर्षीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ वितरण सोहळा २६ मार्च २०२३ रोजी दुपारी १ वाजता यशदा येथे होणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. यासोबतच प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनिता सिंग आदीदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्राम/विभाग/जिल्हा या पाच संवर्गामध्ये राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आणि महसूल विभाग (वृत्तस्तर) स्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.  राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाकरिता १ लाख रुपये, द्वितीय क्रमांक ७५ हजार रुपये, तृतीय क्रमां

‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी- उपमुख्यमंत्री ; पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. २० : प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३ हजार १२० सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.         यावेळी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने - पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे,  समिती सदस्य  धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.               उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच न

पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक - चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. 20 : पुणे जिल्ह्यातील सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. याबाबत मालक आणि भाडेकरू यांचे हक्क अबाधित ठेवून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले. आज विधानभवनात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलत होते. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अॅड. वर्षा डहाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्त सहकारी सोसायट्यांना भाडेपट्टी देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबत शासनाने ८ मार्च २०१९ रोजी निर्णय घेतला आहे. शासनस्तरावर जिल्हाधिकारी, पुणे कार्यालयाकडून वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. यासंदर्भात तेथील नागरिकांच्या मागण्या व अडचणींचा विचार करून तसेच

पुण्यात लोककला पथकांद्वारे शासनाच्या योजनांची जनजागृती

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                        पुणे दि.20: जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने लोककला पथकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जन कल्याणकारी योजनांची जनजागृती मावळ तालुक्यात सुरू आहे. या कार्यक्रमात पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना, कन्यादान योजना व रमाई आवास योजना यासह विविध योजनांची माहिती ‘लोकशिक्षणासाठी मनोरंजन’ या स्वरुपात दिली जात आहे. कला पथकाच्या या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जान्हवी फांऊडेशन कलाथकाच्यावतीने मावळ तालुक्यातील लोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हे, टाकवे, वडगाव मावळ याठिकाणी कार्यक्रम सादर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांच

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन ;नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील-पालकमंत्री

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. १९ :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने  नेत्र उपचारासाठी उभारलेल्या समर्पित रुग्णालयामुळे नागरिकांना नेत्र उपचाराच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून सर्व घटकातील नागरिकांना या सेवा निश्चितपणे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलसह विविध   प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, प्रशासक तथा महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रुपाली महेशगौरी आदी उपस्थित होते.  महापालिकेने नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रका

वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. १९ : वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १७ वाड्यांचा समावेश करण्यात आला असून येत्या ३० वर्षातील या भागातील पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. जल जीवन मोहिमेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत वारूळवाडी भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना  दूषित पाण्यामुळे आजार होतात. याचा विचार करता ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरीता ७० हजार कोटीची 'हर घर जल' योजना कार्यान्वित करण्यात आली.  त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळजोडणी देण्यात येणार आहे. वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी ४७ कोटी ४८

सोमाटणेजवळ मुंबई -पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क निगडी (प्रतिनिधी) दि.१८, मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर आज सकाळी सुमारे ७:३० वाजता एका कारचा विचित्र अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या पतऱ्याचा डिवाईडर थेट कारच्या आरपार शिरला.                       चालकाचा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र  तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१- अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या  चित्ररथाचे  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले.  अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.  अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनावर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. एलईडी स्क्रीन असलेले दोन चित्ररथ जिल्ह्यातील सुमारे १५० गावातून फिरणार आहे. चित्रफितीच्या माध्यमातून शासकीय योजनांवर आधारित यशकथा आणि योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. वाहनावरही योजनांची माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहका

संप काळात आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याच्या आरोग्य आयुक्तांच्या सूचना

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१७-: राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी  पुकारलेल्या  संपाच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील रुग्णसेवेत कुठेही बाधा येऊ नये व विनाअडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार  यांनी राज्यातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे सूचना  दिल्या आहेत. संपाच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य सेवा सुरु राहावी यासाठी व क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवा बाधित होणार नाही यासाठी  आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आ

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१७-कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च  रोजी रात्री ११  ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत  तसेच २३ मार्च रोजी  रात्री ११  ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत    बंद राहणार आहे. या कालावधीत  सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे. व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. १७ : महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाज आणि देश समजून घ्यावा. त्यातून पुढील आयुष्यात समाज आणि देशासाठी योगदान द्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.             उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय सल्लागार समितीची बैठक एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सल्लागार राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे उपस्थित होते, तर विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.  

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठात ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ समिती गठित- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              सोलापूर, दि. १७ : सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात कोरोना काळात पदवी व पदव्युत्तर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ समिती गठित करणार आली आहे. ही समिती येत्या 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल देईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.             सदस्य राम सातपुते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील ऑनलाइन परीक्षा तसेच क्रीडा महोत्सवातील अनियमितता याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.             मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोरोना काळात ऑफ लाईन परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा पद्धतीत नियमांचे पालन झाले की नाही यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली या समितीकडून 30 एप्रिलपर्यंत अहवाल मागविण्यात येईल. या समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. या अहवालानुसार दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी ;जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १७: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयां ऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विविध मागण्यांसाठी लाँगमार्च निघाला. आम्ही त्यांना विनंती केली शेतकरी बांधव व भगिनी यांना  पायी मुंबई पर्यंत येण्याचा त्रास होऊ नये यासाठी मंत्री दादा भुसे, अतुल सावे यांना चर्चेसाठी पाठवले होते. काल मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी चर्चेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक चर्चा झाली. हे सरकार श

मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद;जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    मुंबई, दि 15 :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.   सदस्य दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तसेच मालोजी राजेंच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारण्यात यावे, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री. लोढा बोलत होते.     मंत्री श्री. लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील भुईकोट किल्ला महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाच्या नोदींत मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणज

जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी ; अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१५-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चौकात होत असलेल्या अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपव्यवस्थापक अंकित यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, एनडीए चौकातील कामाचे एनसीसी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी मुळशी ते मुंबई, एनडीए ते मुंबई, बावधन ते कोथरूड आणि मुळशी ते सातारा मार्गाची पाहणी केली. मुळशीकडे जाणाऱ्या अंडरपासच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात यावे. त्यासाठी गर्डर टाकण्याचे काम करताना वाहतूकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक मार्गाची माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिक

‘चला जाणुया नदीला’ अभियानातील युवा जलप्रहरींचा गौरव सोहळा संपन्न

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १५: आंतरराष्ट्रीय नद्यांसाठीच्या कृती दिवसाच्या औचित्याने राज्य शासन आणि जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ‘चला जाणुया नदीला’ अभियानातील युवा जलप्रहरींचा गौरव सोहळा फर्ग्युसन महाविद्यालय येथे संपन्न झाला. यावेळी जलबिरादरीचे संस्थापक डॉ.राजेंद्र सिंह दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमास नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे - देवकाते, शिक्षणतज्ज्ञ देवयानी गोविंदवार, युनिसेफच्या राज्य सल्लागार प्रियंका शेंडगे, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रुपाली गायकवाड, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक प्रदीप वाल्हेकर, जल बिरादरीचे राष्ट्रीय युवा संयोजक गिरीश पाटील आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे - देवकाते म्हणाल्या, पवनायात्रींनी या उपक्रमाच्या माध्यामातून नदीची सद्यस्थिती जीवंत स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे प्रशासकीय कामात उर्जा मिळेल, असेही त्या म्हणाल्या. नगरविकास विभागाचे उपायुक्त श्री. दुर्वास म्हणाले, पवना नदी यात्रा उपक्रमाचे

होलेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोड बनला धोकादायक ; अपघात होण्याची शक्यता

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / बाळासाहेब बोराडे राजगुरूनगर दि. १५, होलेवाडी येथून  जाणारा पुणे नाशिक हायवे बाह्य वळणाचा रस्ता धोकादायक ठरत आहे.पाबळ कडून जाणारी वाहने आणि राजगुरूनगर कडून जाणारी वाहने अचानकपणे जर वळणे घेतली तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कारण या सर्व परिसरात गतिरोधक नाही. संबंधित विभागाने वेळीच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकावे आणि अपघात टाळण्यात यावे अशी मागणी स्थानिक करत आहेत .कारण याच रस्त्यावरुन महाविद्यालयातील, विद्यालयातील, प्रवाशी वाहतूक खेड सेझ ची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.           पुणे नाशिक महामार्गाचे जे बाह्य वळण होलेवाडी परिसरातून गेले आहे. तसेच खेड तालुक्यातील पाबळ,कनेहसर,पूर,रेटवडी,खरपुडी ,दावडी या गावांमध्ये जाणाऱ्या  प्रमुख रस्त्यावर प्रचंड असा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या खालून चारही भागातून वाहतूक सुरू आहे आणि पुलावर जाण्यासाठी या चारही बाजूने बनवलेल्या रस्त्याचा वापर केला जातो. पुलाखालून पूर्व भागातील विविध गावांना जोडणारा रस्ता असल्याने खूपच वर्दळ असते.या बाह्यवळण रस्त्याचा पुलाखालून राजगुरूनगर, पाबळ,कनरेसर, पूर, रेटवडी,खरपुडी,

सोमाटणे टोलनाक्यावर चारचाकी वाहनांना मिळणार सुट ; सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड-दि.१४, सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी तळेगांव दाभाडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवार (दि.११) पासून टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत होता. अखेर सरकारने दखल घेत तात्पुरते दिलासा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.             सध्या अधिवेशन सुरू असल्या कारणाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत तुमची बैठक घेऊ असे आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. तोपर्यंत सर्व चारचाकी वाहनांना टोल घेऊ नये अशी सुचना आय आर बी ला चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी चारचाकी वाहनांना दिलासा मिळाला आहे. 

जागतिक महिला दिनानिमित्त आशा गर्जे यांना महिला कोविड- १९ लसीकरण चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी / दत्ता भगत खेड /शिरोली :  आशा  गर्जे  यांना कोविड कालावधी व कोविड-19 लसीकरण मोहिमेत प्रभावीपणे दिलेल्या योगदानाबद्दल  'महिला कोविड-19 लसीकरण चॅम्पियन"  या पुरस्काराने  - डॉ. उज्वला बर्वे . विभाग प्रमुख,  सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ,  तसेच डॉ वैजयंती पटवर्धन , स्री रोगतज्ञ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी    डॉ.कैलास बाविस्कर उपसंचालक , IEC पुणे.व श्रीमती स्मिता वैद्यनाथन. आहार तज्ञ,   यांच्या उपस्थितीत  'वंडर वुमन्स' हा सन्मान  प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार.तसेच त्यांचा सर्व स्तरांवरून  कौतुकाचाआणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य - मंत्री उदय सामंत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि.१३ : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.             वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी  सुचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.             मंत्री श्री. सामंत म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना गर्दीचे व्यवस्थापन, मंदिर परिसराचा विकास आणि त्यास भव्य स्वरूप देण्यासाठी प्रमुख देवस्थानाचा अभ्यास प्रशासनाने केला आहे. या विकास आराखड्याचे स्वरूप भाविकांना , नागरिकांना अभिप्रेत असेच असेल. शहरातील पुरातन वास्तूंना धोका न पोहचवता हा विकास प्रस्तावित करण्यात येत आहे.  हा आराखडा सध्या प्राथमिक स्तरावर आहे.  अंतिम स्वरूप देताना येथील व्यावसायिक , दुकानदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लाग

वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे दि. १३ : पुणे शहरात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुले व १०० मुलींच्या वसतिगृहासाठी दोन इमारती भाड्याने घेण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृह सुरू केले जाणार आहे. इच्छुकांनी पाचशे रूपयाच्या बंधपत्रावर मालकाचे इमारत भाड्याने देण्याबाबत संमतीपत्र, इमारतीचा तपशील, खोल्या, स्वच्छतागृह, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आदी बाबी नमूद कराव्यात.  इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक ;जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १३: राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा;प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती ने

दारूच्या नशेत केला भर रस्त्यात पत्नीचा खून ; आरोपीला अटक

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पिंपरी - चिंचवड दि.११, दारूच्या नशेत धुंद असलेल्या पतीने आपल्या पत्नीवर धारधार शस्त्राने वार करत भर रस्त्यात खून केल्याची घटना हिंजवडी फेज ३ येथे घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री आठ ते नऊ दरम्यान घडली आहे.             सविता नामदेव राठोड (वय ३०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून पती नामदेव राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे.             पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड दाम्पत्य हे मुळचे सांगली जिल्ह्याचे असून ते हिंजवडी फेज ३ येथे वास्तव्यास आहेत. नामदेव राठोड याला आधीपासून दारूचे व्यसन आहे. काल रात्री देखील तो नशेत होता, त्याने भर रस्त्यात फुटपाथवर पत्नीवर धारधार शस्त्राने वार करत तिला गंभीर जखमी केला आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव   पिंपरी-चिंचवड दि. ११, जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या सोमाटणे टोलनाक्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.  सोमाटणे टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी गुरुवारी टोलनाका हटाव कृती समितीने तळेगाव बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.  मात्र त्याने काही तोडगा न निघाल्याने टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने कालपासून (शनिवार दि.११)  बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आला आहे.              जोपर्यंत टोलनाका बंद होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा निर्धार कृती समितीने केला आहे. या उपोषणास मावळ तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावांनी पाठिंबा दर्शविला आहे. गुरूवारच्या तळेगांव (दाभाडे) बंदला देखील १०० टक्के प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा आंदोलन सर्व मावळ वासियांना मानला जात आहे. परिणामी टोलनाका हटाव समितीला आणखीन बळ मिळाल्याचं पहायला मिळत आहे.             सोमाटणे टोलनाका हे अनधिकृत असून त्यावर होणारी जनतेची फसवणूक थांबली पाहिजे अशी मागणी टोलनाका हटाव कृती समितीची आहे. दरम्यान आय आर बी आणि एम एस आर डी सी कडून आले

स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरूवात-देवेंद्र फडणवीस

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि. ११ - स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल,  असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, भारताचे स्वीडनमधील राजदूत तन्मय लाल, स्वीडनचे राजदूत जॅन थेस्लेफ, स्वीडनच्या मुंबई येथील कॉन्सुल जनरल ॲना लेकवॉल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, उद्योजक बाबा कल्याणी, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सचे कमल बाली  आणि वरिष्ठ स्वीडिश व्यावसायिक  उपस्थित होते. पुणे हे स्वीडनमधील उद्योजकांचे 'सेकंड होम' आहे असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यातील औद्योगिकरणाला स्वीडनमधील उद्योगाच्या स्थापनेने सुरुवात झाली. क्लीन अँड ग्रीन एनर्जी, क्लीन ट्रान्स्पोर्टेशन, ग्रीन हायड्रोजन, सोलर एनर्जी आदी क्षेत्रात महाराष्ट्र आणि स्वीडनला परस्पर सहकार्याची संधी 

नागणहळ्ळीतील संपादित जमिनीची नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरु

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सोलापूर, दि. 28, अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट- महाराष्ट्र कर्नाटक सीमा (सोलापूरच्या स्पर कनेक्टिविटीसहीत) कि.मी. 418/800 ते 547/000 करिता संपादनाची कार्यवाही चालू आहे. सदर महामार्गाअंतर्गत येणाऱ्या मौजे नागणहळ्ळी (ता.अक्कलकोट) या गावातील संपादित होणाऱ्या जमिनीच्या अंतिम निवाडा मंजूर करण्यात आला असून, नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जाण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 1) सोलापूर यांच्याकडून तलाठी यांच्यामार्फत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच, वाढीव क्षेत्राची नव्याने कलम 3 (A) अधिसूचना प्रसिध्द करुन नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.  मौजे नागणहळ्ळी येथील जमीन गट नं. 82 मधील 0.1417 चौ.मी. इतके क्षेत्र संपादित होत असल्याबाबत दि. 26/04/2022 रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. जमिनीची प्रत्यक्ष मोजणी केली असता मोजणी विवरणपत्रानुसार गट नं. 82/1 या जमिनीचे 0.0100 चौ.मी. व गट नं.82/2 या जमिनीचे 0.1500 चौ.मी. इतके क्षेत्र बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. सदर जमिनीचे कलम 3 (A) नुस

जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक- देवेंद्र फडणवीस

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क            मुंबई, दि. 10 : जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.             विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस उत्तर देत होते.             श्री.फडणवीस म्हणाले की, लोककल्याणकारी राज्यात समाजातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजना राबविण्यासाठी अर्थव्यवस्था योग्य राखणे आवश्यक आहे. 2005 साली तेव्हाची परिस्थिती विचारात घेऊन नवीन निवृत्ती योजना लागू करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला होता. सध्या राज्याचा अत्यावश्यक खर्च अर्थव्यवस्थेच्या 56 टक्के असून वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजावर होणारा हा खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. आता जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा लागू केल्यास याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम दिसून येतील.             जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय विचारपूर्वक घेणे गर

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार - शंभुराज देसाई

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क            मुंबई, दि. 10 : “पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या  भूखंडाचे भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रॉपर्टीकार्ड देण्यात येतील,” असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.           याबाबत विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.      मंत्री देसाई म्हणाले, “प्राधिकरणासाठी संपादित झालेले क्षेत्र हे प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशी वेळीचे मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. यात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा व इतर प्रयोजनाच्या भूखंडाचा ले-आऊट मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 8 हजार 300 भूखंडांचे 99 वर्षाच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लव

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत- नरेंद्र पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १०: आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ व्यवसाय, उद्योग उभारण्यास इच्छुक मराठा समाजातील युवकांना मिळेल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. महामंडळाच्या योजनेंतर्गत कर्जवाटपाबाबत बँक प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, पुणे शहर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, सहकारी बँकांकडून महामंडळाच्या कर्ज व्याज परताव योजनेंतर्गत कर्जवाटपाचा बँकनिहाय आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकांनी अपेक्षित कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नसून आगामी आर्थिक वर्षामध्ये नियोजनबद्धरित्या या योजनेचा प्रचार- प्रसार बँक शाखास्तरावर करावा तसेच कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. महामंडळाने छोट्

घरेलू कामगारांना विशेष सहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १०: घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबरअखेर नोंदणी असलेल्या व ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांनी सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे विशेष सहाय्य मिळण्याकरिता ३१ मार्च पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्ह्याच्या सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.  घरेलु कामगारांनी विहित नमुन्यातील प्रपत्र 'अ' सह बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतची मागील दोन वर्षाची नोंदणी/नूतनीकरण केलेल्या पावतीची आणि आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.  घरेलू कामगारांनी योजनेच्या माहितीसाठी, प्रपत्र अ च्या नमुन्यासाठी, तसेच अर्ज सादर करण्यासाठी कामगार उप आयुक्त, यांचे कार्यालय, बंगला नं.- ५, पुणे-मुंबई रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५  येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 10 : ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात  सकारात्मक आहे. यासाठी  लवकरच शासकीय समितीची  बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.             राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.  यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,  शशिकांत शिंदे ,  सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.             उपमुख्यमंत्री म्हणाले ,  अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. ते  सन 2019 मध्ये वाढवून 6 हजार 500 इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील.             पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या