सोमाटणे टोलनाक्यावर चारचाकी वाहनांना मिळणार सुट ; सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड-दि.१४, सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी तळेगांव दाभाडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवार (दि.११) पासून टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत होता. अखेर सरकारने दखल घेत तात्पुरते दिलासा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सध्या अधिवेशन सुरू असल्या कारणाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत तुमची बैठक घेऊ असे आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. तोपर्यंत सर्व चारचाकी वाहनांना टोल घेऊ नये अशी सुचना आय आर बी ला चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी चारचाकी वाहनांना दिलासा मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा