पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी / लतिफ शेख



 बारामती दि.३०,   पुणे जिल्ह्यातील तेरा तालुके, पुणे शहर व पुणे विभाग येथील सर्व माध्यमिक व इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षकांना खेळाचे अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी बारामती येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

बारामती क्रीडा संकुल येथे 27 मार्च ते तीन एप्रिल पर्यंतया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे 

उद्‌घाटन प्रंसगी राज्यस्तरिय क्रीडा मार्गदर्शक महेश चावले, व मास्टर ट्रेनर म्हणून काम करणारे अशोक देवकर , किरण झुंरगे, विश्वनाथ पाटोळे , लतिफ शेख , जालिंदर आवारी , व इंदापूरचे शरद झोळ , तसेच पुणे जिल्ह्यातील विविध प्रशालेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते .

प्रशिक्षण वर्गामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून प्रथम योगा व झुंबा यांनी सुरुवात होऊन नेट बोल, थ्रो बॉल , कबड्डी , लॉग टेनिस , मैदानी खेळ, हॉलीबॉल, तलवारबाजी , अशा विविध खेळाचे अद्ययावत ज्ञान क्रीडा शिक्षकांना देण्यात  येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येतो.

२९ मार्च रोजी क्षेत्रभेट शारदा नगर मधील शिक्षण संकूल तसेच शेती संकूल येथे भेट देवून विज्ञान वर्ग मत्स विभाग दूध उत्पादक क्षेत्र आशा विविध योजनेचा प्रशिक्षणार्थीनी माहिती घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात