दारूच्या नशेत केला भर रस्त्यात पत्नीचा खून ; आरोपीला अटक

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पिंपरी - चिंचवड दि.११, दारूच्या नशेत धुंद असलेल्या पतीने आपल्या पत्नीवर धारधार शस्त्राने वार करत भर रस्त्यात खून केल्याची घटना हिंजवडी फेज ३ येथे घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री आठ ते नऊ दरम्यान घडली आहे.



            सविता नामदेव राठोड (वय ३०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून पती नामदेव राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे.

            पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड दाम्पत्य हे मुळचे सांगली जिल्ह्याचे असून ते हिंजवडी फेज ३ येथे वास्तव्यास आहेत. नामदेव राठोड याला आधीपासून दारूचे व्यसन आहे. काल रात्री देखील तो नशेत होता, त्याने भर रस्त्यात फुटपाथवर पत्नीवर धारधार शस्त्राने वार करत तिला गंभीर जखमी केला आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद