घरेलू कामगारांना विशेष सहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. १०: घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबरअखेर नोंदणी असलेल्या व ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांनी सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे विशेष सहाय्य मिळण्याकरिता ३१ मार्च पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्ह्याच्या सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे. 


घरेलु कामगारांनी विहित नमुन्यातील प्रपत्र 'अ' सह बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतची मागील दोन वर्षाची नोंदणी/नूतनीकरण केलेल्या पावतीची आणि आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 


घरेलू कामगारांनी योजनेच्या माहितीसाठी, प्रपत्र अ च्या नमुन्यासाठी, तसेच अर्ज सादर करण्यासाठी कामगार उप आयुक्त, यांचे कार्यालय, बंगला नं.- ५, पुणे-मुंबई रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५  येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात