होलेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोड बनला धोकादायक ; अपघात होण्याची शक्यता
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / बाळासाहेब बोराडे
राजगुरूनगर दि. १५, होलेवाडी येथून जाणारा पुणे नाशिक हायवे बाह्य वळणाचा रस्ता धोकादायक ठरत आहे.पाबळ कडून जाणारी वाहने आणि राजगुरूनगर कडून जाणारी वाहने अचानकपणे जर वळणे घेतली तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कारण या सर्व परिसरात गतिरोधक नाही. संबंधित विभागाने वेळीच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकावे आणि अपघात टाळण्यात यावे अशी मागणी स्थानिक करत आहेत .कारण याच रस्त्यावरुन महाविद्यालयातील, विद्यालयातील, प्रवाशी वाहतूक खेड सेझ ची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
पुणे नाशिक महामार्गाचे जे बाह्य वळण होलेवाडी परिसरातून गेले आहे. तसेच खेड तालुक्यातील पाबळ,कनेहसर,पूर,रेटवडी,खरपुडी ,दावडी या गावांमध्ये जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर प्रचंड असा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या खालून चारही भागातून वाहतूक सुरू आहे आणि पुलावर जाण्यासाठी या चारही बाजूने बनवलेल्या रस्त्याचा वापर केला जातो. पुलाखालून पूर्व भागातील विविध गावांना जोडणारा रस्ता असल्याने खूपच वर्दळ असते.या बाह्यवळण रस्त्याचा पुलाखालून राजगुरूनगर, पाबळ,कनरेसर, पूर, रेटवडी,खरपुडी, निमगाव, दावडी अशा विविध गावांमध्ये जाणाऱ्या वाहनाला बाह्यवळण घेऊन आलेली वाहने दिसत नाही. त्यामुळे खूप मोठया प्रमाणावर अपघात होत आहे. रात्रीच्या वेळी नवीन येणाऱ्या वाहनास या पुलाखालच्या रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या चारही जोड रस्त्यावर बहिर्वक्र आरशे,गतिरोधक बसवावेत अशी मागणी वाहन चालक ग्रामस्थांनी व नागरिकांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा