पोस्ट्स

शनिवारी राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.30: कै.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  तसेच कृषि विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.  कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे योजना -डॉ. प्रशांत नारनवरे ;महामंडळाकडे त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.३०- ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून ऊसतोड कामगारांनी त्वरीत महामंडळाकडे नोंदणी करावी असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले  आहे. ऊसतोड कामगार संबंधातील विविध प्रश्न आणि अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्तालयात आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.नारनवरे यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कामगार उपआयुक्त डॉ. संतोष कानडे, साखर आयुक्तालयाचे सहसंचालक संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे  व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ,  वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी उपस्थित होते.  ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जातो. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामग

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत असून इच्छुक स्वयंसहायता गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी ३ लाख ५० हजार या मर्यादेत (९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा) किमान ९ ते १८ अधशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के हिस्सा पूर्ण भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के (कमाल ३ लाख १५ हजार रुपये) अनुदान देय राहील. स्वयंसहायता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार इतकी असा

गर्डर उभारण्यासाठी चांदणी चौकातील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित करण्याचा निर्णय

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,  दि. २८: चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर ४ जुलै ते १५ जुलै २०२३ या कालावधीत रात्री ००.३० (सोमवारी रात्री १२.३० पासून) ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ.काकासाहेब डोळे,  सहायक आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील च

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलकरिता अर्ज करण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८: जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजातील गटई काम करणाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.  अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजासाठी गटई काम (चामड्याच्या वस्तू दुरुस्ती व पादत्राणे दुरुस्ती) करणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत रस्त्याच्या कडेला ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर ४ फूट गुणिले ५ फूट गुणिले ६.५ फूट लांबी, रुंदी व उंची या आकाराचा पत्र्याचा स्टॉल देण्यात येतो.  योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजातील असावा. लाभार्थ्यांची वयोमर्यादा ही १८ ते ६० इतकी असावी. अनुसूचित जातीचा दाखला, नागरी भागासाठी ५० हजारपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या तर  ग्रामीण भागासाठी ४० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या धारकांना स्टॉल ठेवण्यासाठी स्वतःची जागा किंवा नगर परिषद, महानगरपालिका जागेमध्ये ठेवण्यासाठी ना

एक रुपयात पीक विमा; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या निर्गमीत होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५- २६ याकरीता ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’( कप ॲण्ड कॅप मॉडेल  ८०:११०) राबविण्यास राज्य शासनाने २६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.  नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासुन शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा प

महाडीबीटी पोर्टल वरील राज्याच्या 'ई-वॉलेट' चे केंद्र शासनास सादरीकरण ;समाज कल्याण विभागाच्या कार्याची केंद्रीय सचिवांकडून दखल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२८: राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी प्रणालीवर अर्ज केल्यानंतर सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  विकसित केलेल्या ‘ई-वॉलेट’ चे सादरीकरण केंद्र शासनाच्या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता  मंत्रालयासमोर करण्यात आले. आज दिल्ली येथे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हे सादरीकरण केले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी या प्रणालीवरून देण्यात येतो. सदर महाडीबीटी प्रणालीवर अर्ज केल्यानंतर शिष्यवृत्ती चा लाभ संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांना सुरळीत होण्याकरिता राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  ‘ई-वॉलेट’ ही संकल्पना केंद्र शासनाच्या पी.एफ.एम.एस. द्वारे वितरण करण्याची प्रणाली विकसित केलेली आहे.  2018-19 पासून या प्रणालीचा वापर करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये त्यांच्या निर्वाह भत्त्याची रक्कम तसेच महाविद्यालयांना देय असलेली संबंधित विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्ष

जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्व याचे औचित्य साधून राज्यात २६ जून ते २६ जुलै या कालावधीत पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिली आहे.  या मोहिमेअंतर्गत शाळा शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र देण्यासोबत इयता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी परीक्षेला बसलेल्या, पदविका तृतीय वर्ष अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र शाळेतच मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, गटशिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमीक), उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, शाळा मुख्याध्यापक यांच्या मार्फत आवश्यक नियोजन व सक्षम कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  कोणीही मागासवर्गीय विद्यार्थी जात प्रमाणपत्रा पासून वंचित राहू नये हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये श

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरती होण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २८ : मराठवाडा इको बटालियन अंतर्गत येत असलेल्या १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांची एकूण २४९ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे  लेफ्टनंट कर्नल  एस. डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.  १०१ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, जनरल परेड ग्राउंडच्या मुख्य गेटजवळ, अर्जुन मार्ग पुणे येथे २४ जुलै ते २७ जुलै व मुख्यालय ९७ आर्टी ब्रिगेड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजित करण्यात येणार आहे.  १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियन मध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरची ६ , सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य), लिपिक जीडी (सामान्य कर्तव्य) ६, शेफ समुदाय ५, वॉशरमन २, ड्रेसर ३, घरकाम पाहणारी व्यक्ती ३, लोहार १, मेस किपर १,  कारागीर (लाकूड - कामगार ) १, मेस शेफ १ अशी एकूण २४९  पदे रॅलीच्या माध्यमातून भराव

आकुर्डी येथील श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेने जपली सांप्रदायिक आषाढी वारी पालखी सोहळ्याची परंपरा

इमेज
epaper - janlok varta - 28-06-2023  

पत्नीचा खून करून दोन मुलांना विहिरीत ढकलून एका डाॅक्टराच्या आत्महत्येनं दौंड तालुक्यात खळबळ; विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी टाक पिता-पुत्रांची मदत

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचा खून करून दोन मुलांना विहिरीत ढकलून देत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दौंड येथे घडली होती. या लहान मुलांचे मृतदेह विहिरीतील खोल पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हडपसर येथील डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाक या पिता- पुत्रांची मदत घेण्यात आली. वरवंड (ता. दौंड) येथे दिवेकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर, त्यांच्या दोन लहान मुलांचे मृतदेह विहिरीत असल्याचे पोलिसांना समजले. यावेळी यवत पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी टाक पिता-पुत्रांची मदत घेतली. टाक पिता-पुत्रांनी रात्री अकरा वाजता विहिरीत दोरीच्या साह्याने उतरून तळाशी असलेले चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढले. वीरेंद्रसिंग टाक, सूरज काची व शुभम झगडे यांनी या कामामध्ये टाक पिता-पुत्रांची आहे. मदत घेतली. हडपसर गाडीतळ येथील शिकलकर वस्तीमध्ये टाक कुटुंबीय राहतात. लहानपणापासून डॉ. बच्चूसिंग टाक यांनी कालव्यात पोहण्याची सवय होती. कालव्यात बुडणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांनी जीवदान दिले आहे. तर, कालव्यात वाहून येणारे अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस व आपत्ती व्यवस्थापन व

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा होणार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून हा "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्यादृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रती अधिक जागरूकता निर्माण व्हावी यादृष्टिने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे.  समाज कल्याण विभागामार्फत यावर्षीही  २६  जून रोजी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती पायथा आणि राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा पुणे येथून विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला  समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.    सामाजिक न्याय दिनाच्या या कार्यक्रमाला  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक, समितीची स्थापना करून लवकरच निर्णय-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि.२२ :- दूध दरवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करणार असून लवकरच यासंबधी निर्णय करण्यात येईल,  अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दूध दरासंबधी राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संस्था व पशुखाद्य उत्पादक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रा.सुरेश धस, आमदार राहूल कुल, संग्राम थोपटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दूध संघांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री.विखे पाटील म्हणाले, दूधाच्या दरवाढीबाबत पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर समितीद्वारे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. दूध उत्पादक संघानीदेखील शासनाला सहकार्य करावे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. दूध भेसळीस प्रतिबंध व्हावा यासाठी दूधाच्या भेसळीस प्रोत्साहन देणाऱ्

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीला ब्रेक ; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि.२१, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या नियुक्त्यांसाठी सुधारीत अटी लागू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. नव्याने नियुक्तीनंतर इ

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२२:  राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी  सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.  मुक्तांगण इंग्रजी विद्यालयात पुणे विद्यार्थी गृह आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'उच्च शिक्षणाच्या खाजगी संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात व्यवस्थापनाची भूमिका' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी.जी. सीताराम, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुनील रेडकर आदी उपस्थितीत होते.   मंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याला महत्व देण्यात आले आहे. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी विषयाची पुस्तके लवकरच मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्या

मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्या - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २२: आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा. मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार वगळणी यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले. यशदा येथे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आयोजित राज्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक तयारी करायची आहे.  भारत निवडणूक आयोगाने यापूर्वीच याबाबत सर्व तयारी सुरू केली आहे. आयोगाने सर्व मतदार संघातील कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांची तयारी, संवेदनशील मतदान केंद्र निश्चिती आदींचा

जिल्ह्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क           पुणे, दि. २२: नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन कार्यवाही अधिक गतिमानतेने करा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन वाळू धोरण अंमलबजावणी व वाळू डेपो सुरु करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, संग्राम थोपटे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, सुरेंद्र नवल, ज्योगेंद्र कट्यार, गोविंद शिंदे, मिनाल मुल्ला, राजेंद्र कचरे व वैभव नावडकर उपस्थित होते.           महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत वाळू  उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्

उद्योगमंत्री उदय सामंत यांची हातकागद संस्था संशोधन, प्रशिक्षण विभागास भेट; संस्थेच्या गुणवत्ता व उपयुक्तता सुधारण्यासाठी शासन कटीबद्ध-उद्योगमंत्री

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २२: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उपयुक्तता वाढविण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत हातकागद संस्था संशोधन, प्रशिक्षण विभागाला भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी एन. जी. पाटील, सहसंचालक उद्योग सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी. जी. रेंदाळकर, संचालक हातकागद तथा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, उद्योजक मंगेश लोहपात्रे आदी उपस्थित होते.    सामंत म्हणाले, खादी व ग्रामोद्योग मंडळाची हातकागद ही महाराष्ट्रातील एकमेव जूनी संस्था आहे.  या संस्थेची  वार्षिक उलाढाल त्यातुलनेत आहे. या ठिकाणी उत्पादीत होणाऱ्या उत्पादनास चांगली बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. या ठिकाणी टाकाऊ कागद, जलपर्णी, जुनी कपडे यावर प्रक्रिया करुन फाईल, फोल्डर, कागद आणि इतर स्टेशनरी  वस्तू बनविल्या जातात, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.  संस्थेत तयार

मोठी बातमी- वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारकडून विमा संरक्षणाची घोषणा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / दयानंद गौडगांव  पुणे दि.२१, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला यंदा तब्बल १८ लाख वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण असणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल.

शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये योग दिवस साजरा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क शिराळा दि.२०, येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एन. सी.सी. ऑफिसर अरुण हाके यांच्या मार्गर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग अभ्यास केला. यावेळी  मुख्याध्यापक अंगराज माजगावकर यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थीदशेत योग साधनेचे महत्त्व जाणून घेवून नियमित पणे योग करावा. व निरोगी राहण्यासाठी योग साधनेची आवश्यकता पटवून देण्यात आली. यावेळी भास्कर हराळे सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने व त्यांचे महत्त्व सांगितले .  यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी.माजगावकर, पर्यवेक्षक एस.बी.नांद्रे, क्रीडा शिक्षक एस.एस.चव्हाण तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठी अपडेट - ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत मोठी कपात ; मातोश्रीवरची सुरक्षाही केली कमी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि. २१,   राज्यातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या  सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे.  उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी, तसंच पायलटही कमी केलाय.  मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा आता व्हाय प्लस करण्यात आली आहे.  राज्याच्या गृहविभागाने हा आदेश दिला आहे. आदेशानुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात कमी करण्यात आली आहे. केवळ उद्धव ठाकरेच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबांच्याच सुरक्षेत कमी केली आहे. अचानक सुरक्षा कमी करण्याबाबत गृहविभागाकडून कोणतंही कारण अद्याप देण्यात आलेलं नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक मार्गदर्शन शिबिर शिरोली येथे संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी : दत्ता भगत खेड / शिरोली दि २० , पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर व आयुर्वेदिक मार्गदर्शन  डॉ प्रताप पवार पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या मध्ये केमिकल मुक्त भारत अभियान स्वदेशी आपणाये देश निरोगी जीवन पाये .या शिबिरात  प्रामुख्याने गुडघे दुखणे, संधिवात, मणक्याचे विकार,पोटाचे सर्व आजार,दमा, लखवा, कावीळ,क्षयरोग (टी. बी.) अशा विविध रोगांवर मार्गदर्शन आणि उपाय योजना या संदर्भात तोला मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी शिरोली आणि पंचक्रोशीतील जवळपास चार पाचशे च्या आसपास  विविध लहान थोर वडीलधारी लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.यामुळे सर्व लोकांनमध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.यावेळी ग्रामपंचायत शिरोली च्या लोकनियुक्त सरपंच मुदिता देखणे,उपसरपंच गोरक्षनाथ सांडभोर, सर्व सदस्य, मा सरपंच चंद्रकांत सावंत,सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे आणि शिरोली गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली  चे आदर्श मुख्याध्यापक राज

भोसे येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची G 20 शिखर संमेलन प्रदर्शनास भेट

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / रोहन सावंत खेड दि.२०, भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील G20 शिखर संमेलनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर  मांडण्यात आलेल्या  प्रदर्शनास भेट दिली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश गवळी यांनी दिली .       देशभरातील अध्ययन आणि अध्यापनात चालू असलेले भविष्यकालीन प्रयोग , भेटायला येणारा रोबो , पारंपारिक जादुई पिटाऱ्यापासून आभासी त्रिमितीय जगापर्यंतचे अभिनव प्रयोग , पुणेरी वाहन उद्योगांची डिजिटल भिंत,केरळच्या प्राथमिक शिक्षणापासून ते मेघालयातील पहाडी शिक्षणापर्यंत सर्वच राज्यांतील शैक्षणिक प्रयोगांचा महाकुंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरला आहे .त्याची झलकएकाच ठिकाणी पाहण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी लाभल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केला .

लेख : आंतरराष्ट्रीय योगदिन आणि आपण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  हिंदुस्थानचा इतिहास पाहता वेद उपनिषदांच्या काळापासू न म्हणजेच सुमारे ५००० वर्षांपासून हिंदुस्थानास ऋषीमुनींची परंपरा लाभलेली आहे आणि त्या काळातील अनेक ऋषीमुनींनी योगाभ्यास व योग साधनेद्वारे कठोर तपश्चर्या करून बौद्धिक व आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती करून या साधनेतून मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो आणि मनाची एकाग्रता व आत्मविश्वास प्राप्त करता येऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे आणि इतिहास त्याचा साक्षी आहे.          पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वतः योगविद्येचे उपासक आणि प्रसारक असल्याने आणि योगसाधनेद्वारे मन,मेंदू आणि मनगट यांचा विकास होऊन प्रवृत्ती व प्रकृती यांत सकारात्मक बदल होऊन मानसिक स्वास्थ्य लाभून विश्व आरोग्यसंपन्न, सकारात्मक, आशावादी व शांतताप्रिय व्हावे या उदात्त हेतूने सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात २१ जून हा *जागतिक योगदिन* म्हणून साजरा करण्याचा ठराव मांडला आणि तो १७७ राष्ट्रांच्या पाठिंब्याने संमत झाला.आश्चर्य म्हणजे या आठ नऊ वर्षाच्या कालखंडात १९३ देशात हा दिवस साजरा होऊ लागला असून जगभरातील सुमारे २५० कोटी लोकांनी या योगाभ्यासाचा लाभ घेऊन

G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाच्या (एडडब्ल्यूजी) चौथ्या बैठकीचा पुण्यामध्ये प्रारंभ ; भारताचे G20 अध्यक्षपद म्हणजे जागतिक शांततेसाठी विविधतेचा लाभ घेण्याची संधी- हर्षवर्धन श्रृंगला

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाची (एडडब्ल्यूजी) चौथी बैठक आज पुण्यामध्ये सुरु झाली. 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सादर केल्या जाणार्‍या फलनिष्पत्ती दस्तऐवजाना या बैठकीत अंतीम स्वरूप दिले जाईल. भारताचे शिक्षण विषयक कार्य गटाचे अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती यांनी, शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव संजय कुमार, आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यांच्या सह या बैठकीचे पाळीपाळीने अध्यक्षपद भूषविले. चौथ्या शिक्षण विषयक कार्य गटाच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी G20 प्रतिनिधींबरोबर  मंत्री स्तरीय घोषणापत्राच्या मसुद्यावर चर्चा झाली. युनिसेफ (UNICEF), OECD आणि युनेस्को (UNESCO) या आंतरराष्ट्रीय संघटनांनी शिक्षण कार्य गटाचा अहवाल सादर केला. एडडब्ल्यूजी अहवाल आणि संकलनाद्वारे संपूर्ण गटासाठी सर्वसमावेशक पद्धतीने एक समान उद्दिष्ट ठरवून, शैक्षणिक धोरणे आणि कार्यक्रम ठरवण्याच्या, भारताचे G20 अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सातत्त्यपूर्ण  प्रयत्नांची G20 सदस्य आणि निमंत्रित देशांनी प्रशंसा केली.  जगातील सर्वा

‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे: दि.२०:  ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि  विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.  सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-२०’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी भारताच्या जी-२० अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी कॅट्रिअना जॅक्सन, सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थितीत होते.   या परिषदेला ४७ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलेले महत्वाचे घटक यानिमित्ताने जागतिक स्तरावर उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्यांवर विचारमंथन करण्

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि.२०- पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभूणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. यावेळी श्री. प्रभूणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे

राजगुरुनगर मधील बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क राजगुरुनगर दि.२५ (प्रतिनिधी - योगेश माळशिरसकर)     सोहम नाटय संस्था व स्वास्थ्यमंत्र व्याख्यानमाला राजगुरूनगर आयोजित राजगुरूनगर मध्ये ६ ते १४ वयोगातील विद्यार्थ्यासाठी पहिले बालनाट्य प्रशिक्षण उत्स्फूर्त प्रतिसादासह नुकतेच दि. ७ मे ते २१ मे या दरम्यान  पार पडले .      यासाठी एकूण ४० मुलांनी शिबिरात सहभाग नोंदवला.नाटक आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर दिग्दर्शक,संगीतकार, व्हॉईस आर्टिस्ट यांनी नाट्य कलेची विविध माहिती ,नाटकाचे प्रकार , प्रात्यक्षिकांसह मुलांना मार्गदर्शन केले.         १५ दिवस चाललेल्या या शिबिराची सांगता रविवार (दि.२१ मे)रोजी समतानगर,वाडा रोड वरील सारा इंटरनॅशनल स्कूल येथे देवाची फुलं,वेडात मराठे वीर दौडले सात,राजहंस,मूकनाट्य  Mime Act,अप्पर डिप्पर या नाटकांच्या सादरीकरणाने झाली.     या शिबिरासाठी प्रतिक खिसमतराव,डॉ.नीलम गायकवाड,डॉ.शीतल ढवळे - खिसमतराव ,डॉ.कुंतल जाधव  या आयोजकांनी  राजगुरुनगर मध्ये प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले .

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास खिशाला बसणार दुप्पट कात्री ; वाहतूक विभागाने जारी केले नवीन दंडाच्या रकमेची यादी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि २६, पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आले आहे. वाहतूक नियम: वाहनाचा प्रकार - दुचाकी - चारचाकी प्रथमच दंडाची रक्कम - रु 500 - रु. 500 दुसऱ्यांदा दंडाची रक्कम - रु 1500 - रु. 1500 टोइंग चार्ज: दुचाकी - 200 रु चारचाकी - 484 रु दुचाकी - रु 85.56 चारचाकी - रु 87.12 दुचाकी - रु 785.56 (पहिल्यांदा) आणि रु 1,785.56 (दुसऱ्यांदा) चारचाकी - रु 1,071.12 (पहिल्यांदा) आणि रु 2,071.12 (दुसऱ्यांदा)

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार- मंत्री शंभूराज देसाई

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई ,  दि. 18 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत ,  त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत ,  यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात  ‘ शासन आपल्या दारी ’  हे अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे दि.१३ मे रोजी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी अंतर्गत २७ हजार पात्र लाभार्थींना लाभ झाला असून  या अभियानांतर्गत  जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ होण्यासाठी सातारा पॅटर्न तयार करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.             मंत्री श्री. देसाई यांनी आज शासन आपल्या दारी अभियान व जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन या विषयाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.             मंत्री श्री. देसाई म्हणाले ,  शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व कोणताही पात्र लाभार्थी या

आकुर्डी रेल्वेलाइन हद्दीतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  निगडी दि.१८, आकुर्डी रेल्वे लाइन हद्दीतील अवैध टपऱ्यांवर पालिकेने कारवाई केली. आकुर्डी रेल्वलाइन हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालला होता. अखेर आज पालिका प्रशासनाने त्याच्यावर धडक कारवाई केली आहे.          पिंपरी चिंचवड महानगरपालिके आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणावर धडक मोहीम राबविण्याचे काम करत आहेत. शहरातील सर्व अ ते ह क्षेत्रीय हद्दीत अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जात आहे. मात्र याला अनेक कष्टकरी आणि फेरिवाल्या संघाकडून विरोध देखिल होताना पहायला मिळत आहे.

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                  मुंबई ,  दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये ,  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.            आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे  ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या श्री. शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये ,  असे निर्देश दिले. तसेच या वा

गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू, त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि.१७ : गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National games), २०२२ स्पर्धेतील राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली  असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.             महाजन म्हणाले, स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पदक प्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहिर केली आहे. खेळाडू व मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकासाठी एकूण रक्कम रू. २०३६.७० लक्ष प्राप्त झालेली आहे.              राज्याचे क्रीडा धोरण अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित असून त्याअंतर्गत दि. २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात या राज्यात संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National g

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१७: पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भरता निधी अर्थात स्वनिधी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रमकुमार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पथविक्रेत्यांनी एकत्रितपणे वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कमी किमतीत खरेदी होईल. त्यामुळे मिळणारे उत्पन्न वाढविता येईल.  सुरुवातीच्या खरेदीसाठी  निधी उभारण्यातांना लोकप्रतिनिधी मदत करतील. पुढच्या आठवड्यात प्

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय थोडक्यात...

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  दिनांक: १६ मे २०२३ आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. भरीव वाढ.  (कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग) अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय (पदुम विभाग) इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ (उद्योग विभाग) मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण (सामाजिक न्याय) ---------------------- सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले

सातव्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १६: सातव्या युएन जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ते सुरक्षितेतच्यादृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, वाहन वितरक, मोटार वाहन प्रशिक्षण संस्था, पीयूसी केंद्र, रेट्रोफिटमेंट केंद्र, वाहतूकदार संघटना तसेच सामाजिक संस्थेमार्फत ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर वॉकेथानचे आयोजन करणे, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर करण्याकरिता नागरिकामध्ये प्रबोधन करणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉक ऑन राईट बाबत जनजागृतीपर कार्यक्रम करणे, व्याख्याने आयोजित करणे, माहितीपत्रके वाटणे तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  रस्ते अपघाताचे प्रमाण विचारात घेऊन त्याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या जनजागृती होण्यासाठी २१ मे पर्यंत ‘शाश्वत वाहतूक’ या विषयासंदर्भात जनजागृती  करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांप्रती  स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे.  रस्ते

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न; व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १६: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’  संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. *खेड शिवापूर ते नवले पूलदरम्यान दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई* यापूर्वी झालेल्या समितीच्या निश्चित करण्यात आल्याप्रमाणे कात्रज नवीन बोगद्याच्या अलिकडे जांभूळवाड

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश ;सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.१५ - अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या  दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार ;कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.             सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.             बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २० हजार ८६० आहे तर त्य