राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक मार्गदर्शन शिबिर शिरोली येथे संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी : दत्ता भगत
खेड / शिरोली दि २० , पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर व आयुर्वेदिक मार्गदर्शन डॉ प्रताप पवार पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या मध्ये केमिकल मुक्त भारत अभियान स्वदेशी आपणाये देश निरोगी जीवन पाये .या शिबिरात प्रामुख्याने गुडघे दुखणे, संधिवात, मणक्याचे विकार,पोटाचे सर्व आजार,दमा, लखवा, कावीळ,क्षयरोग (टी. बी.) अशा विविध रोगांवर मार्गदर्शन आणि उपाय योजना या संदर्भात तोला मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी शिरोली आणि पंचक्रोशीतील जवळपास चार पाचशे च्या आसपास विविध लहान थोर वडीलधारी लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.यामुळे सर्व लोकांनमध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.यावेळी ग्रामपंचायत शिरोली च्या लोकनियुक्त सरपंच मुदिता देखणे,उपसरपंच गोरक्षनाथ सांडभोर, सर्व सदस्य, मा सरपंच चंद्रकांत सावंत,सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे आणि
शिरोली गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली चे आदर्श मुख्याध्यापक राजेश कांबळे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. आशावर्कर पूनम पवळे आणि जयश्री सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भाग्यश्री साळुंखे आणि क्षवेता काकडे यांनी आरोग्य मार्गदर्शक म्हणून महत्त्वाचे कामकाज पाहिले.डॉ प्रताप पवार आणि त्यांच्या सर्व टीम चे कौतुक शिरोली आणि विविध संस्थाकडून होत आहे. या तपासणी शिबिराचे आयोजन लोकनियुक्त सरपंच कु मुदिता देखणे,उपसरपंच गोरक्षनाथ सांडभोर यांनी केले. नियोजन ग्रामपंचायत टेक्निशियन सागर वाडेकर यांनी केले आणि आयोजन ग्रामसेवक सुरेश घनवट यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा