पत्नीचा खून करून दोन मुलांना विहिरीत ढकलून एका डाॅक्टराच्या आत्महत्येनं दौंड तालुक्यात खळबळ; विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी टाक पिता-पुत्रांची मदत
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीचा खून करून दोन मुलांना विहिरीत ढकलून देत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दौंड येथे घडली होती. या लहान मुलांचे मृतदेह विहिरीतील खोल पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हडपसर येथील डॉ. बच्चूसिंग व आझादसिंग टाक या पिता- पुत्रांची मदत घेण्यात आली.
वरवंड (ता. दौंड) येथे दिवेकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर, त्यांच्या दोन लहान मुलांचे मृतदेह विहिरीत असल्याचे पोलिसांना समजले. यावेळी यवत पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी टाक पिता-पुत्रांची मदत घेतली. टाक पिता-पुत्रांनी रात्री अकरा वाजता विहिरीत दोरीच्या साह्याने उतरून तळाशी असलेले चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढले. वीरेंद्रसिंग टाक, सूरज काची व शुभम झगडे यांनी या कामामध्ये टाक पिता-पुत्रांची आहे.
मदत घेतली.
हडपसर गाडीतळ येथील शिकलकर वस्तीमध्ये टाक कुटुंबीय राहतात. लहानपणापासून डॉ. बच्चूसिंग टाक यांनी कालव्यात पोहण्याची सवय होती. कालव्यात बुडणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांनी जीवदान दिले आहे. तर, कालव्यात वाहून येणारे अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस व आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे.
दरम्यान, त्यांचा मुलगा आझादसिंग हाही वडिलांकडून प्रशिक्षण घेत या कामात पारंगत झाला आहे. आजपर्यंत या पितापुत्रांनी विविध घटनात सुमारे चार हजारांवर मृतदेह व बुडणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले आहे. याशिवाय परिसरातील रस्ते व रेल्वे अपघातातील जखमी व मृतदेह सोडविण्याचे कामही त्यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा