मोठी अपडेट - ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत मोठी कपात ; मातोश्रीवरची सुरक्षाही केली कमी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


मुंबई दि. २१,  राज्यातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या  सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे.  उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी, तसंच पायलटही कमी केलाय. 

मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा आता व्हाय प्लस करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने हा आदेश दिला आहे. आदेशानुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात कमी करण्यात आली आहे. केवळ उद्धव ठाकरेच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबांच्याच सुरक्षेत कमी केली आहे. अचानक सुरक्षा कमी करण्याबाबत गृहविभागाकडून कोणतंही कारण अद्याप देण्यात आलेलं नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात