पोस्ट्स

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०:  मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथक

'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यान संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०:  सामाजिक न्याय विभागातर्फे २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत 'सामाजिक न्याय पर्व' म्हणून साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत 'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्यवाह प्राध्यापक राजेंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळींवर भाष्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या व्यापक विषयावर माहितीपर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व त्यांनी वंचित घटकांसाठी केलेल्या विविध चळवळी याबाबत सखोल माहिती दिली. सत्यशोधक ढोक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून ‘सत्यशोधक विवाह’ संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती देत त्यांनी सत्यशोधक विवाह संस्था व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार यावर प्रकाश टाकला. समाजातील युवक-युवतींनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन केले. सत्यशोधक पद्धतीने लावण्यात येणारे विवाह मोफत करण्यात ये

पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेला सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय येथे  विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.   २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती, अनाथ आदी प्रवर्गातील पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये इयत्ता ११ वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थीनींनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.   या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ९०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.   विद्यार्थीनी बाहेरगावची परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारी असावी. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका,  प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकाचे आधा

बैलगाडा शर्यतींना पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर परवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: राज्य शासनाने प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मध्ये सुधारणेची अधिसूचना  जारी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये  लम्पी चर्मरोगाच्या अनुषंगाने संबंधीत तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडील अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मध्ये सुधारणेची अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सयव्यवसाय विभागाने काल जारी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या उपविभागाच

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक चालकांना आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  ऊस वाहतुकीची ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी अशी वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने प्रवास करीत असतात. प्रवास करताना किंवा उभे असताना दृष्यमान नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकींग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होते. हे टाळण्यासाठी वाहन मालक चालकांनी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिंग टेप लावावे. एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करु नये. वाहनांचा वेग योग्य मर्यादेत ठेवणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करु नये.  वाहने रस्त्याच्या

जिल्हास्तरीय युवा गट कार्यशाळेचे १ डिसेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळा’ तसेच स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ‘उद्योजकता विकास’ या कार्यक्रमांचे आयोजन १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.    सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसोर, येरवडा येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित  कार्यशाळेत जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर यांनी केले आहे.

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क               मुंबई, दि. 24 : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.             सन 2021 मध्ये श्री. अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) तसेच सन 2022 मध्ये श्री. जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था), दिव्यांग कल्याण आयुक्ताल

‘अमृत महाआवास अभियान 2022-23’-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात  20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  24 नोव्हेंबर, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम, मुंबई येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या अभियानामुळे 5 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम क

अग्नीवर भरती प्रकियेचा निकाल घोषित

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २३ : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या 'अग्नीवीर भरती' मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती  कार्यालयात २६ नोव्हेंबर पर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली आहे.

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    पुणे,दि. २३ : नैसर्गिक आपत्ती, किडी व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे आणि नुकसानीच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी बागायत व जिराईत या पीकांस

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २३: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहराबद्दल आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स-२०२२’ अंतर्गत हे नागरिक जाणीव सर्वेक्षण (सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे- सीपीएस) २३ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असून पुणे शहरातील नागरिकांनी ऑनलाईनरित्या या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ (अर्बन आऊटकम फ्रेमवर्क-युओएफ २०२२) चा शुभारंभ केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने २०१८ मध्ये १११ शहरांचा समावेश असणारा पहिला ‘राहणीमान सुलभता निर्देशांक’ जारी केला. त्यानंतर पाठोपाठ २०१९ मध्ये राहणीमान सुलभता निर्देशांक २.० आणि महानगरपालिका कामगिरीचा निर्देशांक जाहीर झाले. शहरांना परिणामावर आधारित नियोजन आणि शहरी व्यवस्थापनाकडे वाटचाल करण्यास मदत करणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते. शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चा उद्देश हा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द

नगरपरिषदांना १५ कोटींचा निधी मंजूर ; खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी/ विशाल खुर्द     शिराळा दि.२२,  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मूलभूत सुविधा व विकास कामांना निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी विषयी मागणी केली होती.या मागणीला यश मिळाले असून रुपये पंधरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.     दरम्यान,राज्यातील नगरपरिषदांना "वैशिष्ट्यपूर्ण" कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.सदर योजनेचे सुधारित निकष व मार्गदर्शक तत्वे शासन निर्णयान्वय विहित करण्यात आले आहेत.सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण या योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी व विविध कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील   नगरपंचायतीसाठी सांगली जिल्ह्यातील नगरपरिषदांना इस्लामपूर ३ कोटी, आष्टा १ कोटी, शिराळा १ कोटी असे विविध विकास कामांसाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.सदर प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्

महाडिक युवाशक्ती आयोजित किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  शिराळा/ विशाल खुर्द -  शिराळा येथील महाडिक युवाशक्ती शिराळा तालुका आयोजित भव्य तालुकास्तरीय किल्ला स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण जेष्ठ नेते मा. जयसिंगराव शिंदे(सरकार) जुनी नाणी व नोटांचे संग्रहक मा.दत्ताजीराव यादव (रावसाहेब)शिराळा विकास सोसायटीचे संचालक मा.महादेव खबाले (तात्या) ,मा.कुमार बाबा गायकवाड नगरसेवक केदार नलावडे ,मा.सचिन नलवडे (काका) मा.संतोष बांदिवडेकर (बापू) मा.गणेश गवाणे (तात्या) मा.हारूनभाई शेख मा.महेश घोडे (बबलुभैय्या ) यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी जवळपास ५० स्पर्धकांनी मंडळांनी  सहभाग घेतला होता.   स्पर्धेचे मानकरी (मोठा गट) प्रथम क्रमांक दुर्गवेडे प्रतिष्ठान,(नलावडे कॉलनी,शिराळा) ५००१/ व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक शंभो महादेव मंडळ (नाझरे गल्ली) शिराळा  ४००४/ व सन्मानचिन्ह तृतिय क्रमांक जिद्दी ग्रुप (कुरणे गल्ली) शिराळा ३००३/- व सन्मान चिन्ह  चतुर्थ क्रमांक कुंभार गल्ली (शिराळा) २००२/व सन्मानचिन्ह पाचवा क्रमांक चकमक चौक (पाडळी) १००१/ व सन्मानचिन्ह (लहान गट)  स्पर्धेचे मानकरी प्रथम क्रमाक - कु. समर्था मारुती तळेकर

पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेला सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २२: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय  येथे  विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती- ५७, विशेष मागास प्रवर्ग -२, अनाथ-२ जागेकरीता प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात इयत्ता ११ वी, पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.  या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ८०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.  विद्यार्थी हा पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्

डेन्मार्कच्या मदतीने राज्यात ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प ; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची डेन्मार्कच्या राजदूतांशी चर्चा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. २१ : डेन्मार्कच्या मदतीने राज्यात पुढील वर्षी ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा केली.             आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज श्री. स्वान यांच्याशी विविध प्रकारच्या सहकार्य कराराबाबतही प्राथमिक चर्चा केली. यावेळी डेन्मार्कचे व्यापार आणि उद्योग मंत्री सोरेन कैनिक, उपमंत्री हेन्री करकेडा, आनंद त्रिपाठी, रुरल डिजीटल हेल्थ अँड फायनान्सचे डॉ. रतिश तागडे आदी उपस्थित होते.             या बैठकीत भारत - डेन्मार्क यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रात औषधे, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा विकास आणि आरोग्य सुविधाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.             या तिन्ही क्षेत्रामधे गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य व डेन्मार्क यांच्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात उच्चस्तरीय बैठक होणार असून दोघांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने सामंजस्य करार करण्याचा दृष्ट

अक्कलकोट शहरात सुरू असलेली अतिक्रमन मोहीम त्वरित थांबवावी ; अक्कलकोट शहर खोके धारक संघर्ष समितीचा नगरपरिषदेवर भव्य मोर्चा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / रफिक खिस्तके अक्कलकोट : दि. २२, अक्कलकोट नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबवून प्रथम खोकेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे बाबत अक्कलकोट शहर खोकेधारक संघर्ष समिती तर्फे भव्य मोर्चा काढून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागिल १५ दिवसांपासून अक्कलकोट शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. परंतु अतिक्रमण काढताना संबंधीत खोकेधारकांना पर्यायी जागा नगरपरिषदेच्या वतीने उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व मुख्याधिकारी यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.  मागिल दोन वर्षांपासून कोरोनामुळे लोकांचा रोजगार बंद आहे. आत्ता कुठे उद्योग व्यवसाय सुरू होत असताना नगरपरिषदेच्या वतीने कारवाई होत आहे. खोकेधारकांनी बॅंके तर्फे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा ही भागवने अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित खोकेधारकांना प्रथम पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी मगच अतिक्रमण काढावे अशी मागणी करण्यात आली

सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक ; सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. २१: महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री चंद्रकांत प

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे दि.२०: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला  लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वानवडी येथे एसआरपीएफ गट-२ परिसरात आयोजित ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, महेश लांडगे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये झालेल्या पोलीस स्पर्धेदरम्यान असे क्रीडा संकुल निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होत

शिराळा नगरपंचायत मार्फत नव्याने श्रमदानास सुरुवात

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / विशाल खुर्द  शिराळा दि.२०,   शिराळा शहराला स्वच्छ, सुंदर,हरित, पर्यावरण पूरक शहर अशी नवीन ओळख मिळवून देऊन शहराचा शाश्वत विकास व्हावा या हेतूने शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत विविध उपक्रम नित्यनेमाने राबविले जातात. त्यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे श्रमदान. मागील दोन वर्षापासूनच शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतूनच आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी शहरात नागरिक संस्था यांच्या सहभागातून विविध सार्वजनिक ठिकाने स्वच्छ करणे व इतर पर्यावरण जतन व संवर्धनाची कामे केली जातात.  या श्रमदानांतर्गत आज दिनांक१८/११/२०२२ रोजी शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत कार्यालयाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या वर्षी पावसाच्या कालावधीत   लागवड करण्यात आलेल्या विविध जाती व प्रजातींच्या वृक्षाच्या मशागतीसाठी श्रमदान केले. या श्रमदानात नगरपंचायत पथकामार्फत सर्व झाडांना  पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होण्याच्या हेतूने गोलाकार आळी करणे, झाडांच्या निर्जीव फांद्या छाटणे, झाडांना आधार

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१९: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते. महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून पालकमंत्री पाटील म्हणाले, आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या. महसूल मंत्री असतांना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी ४०० एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला. या जागेच्या विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास पुणे महानग

स्मारकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ; ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याला आवश्यक निधी देऊ- पालकमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. शासन ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याबाबतीत अतिशय गंभीर असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन कोथरूड येथे आयोजित राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, पुणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे आदी उपस्थित होते. जुन्या वारशाचे शोधकार्य करणे, त्याचे जतन करणे आणि अभिमान म्हणून समोर मांडणे हे काम या प्रदर्शनातून होईल असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील मजबूत, सुरक्षित किल्ल्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजक मेळाव्याचे उदघाटन ; पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार-उद्योगमंत्री उदय सामंत

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे मोशी येथे आयोजित  उद्योजक मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योजगांच्या  समस्या तातडीने सोडविण्यात येतील अशी ग्वाही श्री. सामंत यांनी यावेळी दिली कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, संस्थापक अध्यक्ष तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे,  जयंत कड, अजय भोसले, लघुउद्योजक  उपस्थित होते.    उद्योगमंत्री सामंत म्हणाले, छोटा उद्योग हा मोठ्या उद्योगांचा पाया आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांप्रमाणे लहान उद्योगांनाही महत्व देण्यात येईल.  स्थानिक नागरिकांना उद्योजकांनी रोजगार द्यावेत यासाठी त्यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. पिंपरी चिंचवड लघू उद्योजकांच्या मागण्यांवर  लवकरच विविध विभागांच्या प्रमुखांची विस्तृत बैठक घेऊन त्यावर  मार्ग काढण्यात येईल.   पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत   भंगार व स्क्रॅपची दुकाने  हटविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आह

राष्ट्रीय बालदिनानिमित्त राष्ट्रपती भवन येथे मॉडर्न हायस्कूल भोसे येथील विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन साधला संवाद

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / रोहन सांवत भोसे(ता.खेड ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भोसे ते दिल्ली अशा ऐतिहासिक सहलीचे भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजन केले होते . राष्ट्रपती भेटीसाठी राष्ट्रपती कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला होता .शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य ,स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश ,शाळेचे १००%निकाल या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रपतींनी भेटीचे आमंत्रण प्रशालेस दिले.शिक्षक व विद्यार्थ्यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून विमानाने प्रवास करून भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.देशभरातून १०० शाळांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे या एकमेव शाळेची निवड करण्यात आलेली होती.यावेळी प्रशालेतील श्वेता जाधव , जानवी कुटे , समिक्षा कुटे,प्रणाली कोळी,आर्यन गांडेकर, नैतिक गायकवाड,ओंकार चितळे, शुभम गांडेकर या आठ विद्यार्थ्यांनी व चतुर पाटील , योजना कुटे ,कैलास निळकंठ ,हनुमंत त

सुलाईया दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा आमदार दिलिप मोहिते यांच्या हस्ते संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /लतिफ शेख खेड दि.१८, 'मनस्पंदनकार ' कवी, लेखक प्रा. श्री. संजय राळे पाटील यांच्या ' सुलाई' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे  प्रकाशन मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी खेड तालुक्याचे  आमदार मा.श्री. दिलीप अण्णा मोहिते पाटील, पारनेरचे आमदार मा.श्री. निलेशजी लंके तसेच मॉरिशस मराठी संस्कृती केंद्राचे अध्यक्ष मा. अर्जून पुतळाजी यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती मा. रमेश शेठ राळे पाटील, मा. चंद्रकांत दादा इंगोले (मा. सभापती),  आभाळाखालची शाळा या जागतिक उपक्रमाचे अध्यक्ष मा. दिलीप पुराणिक, सौ. सुरेखा ताई मोहिते पाटील, महाळुंगे गावच्या सरपंच सौ. मंगलाताई भोसले तसेच पुणे जिल्ह्यातील शिक्षकवृंद, महिला आघाडी, कला- साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.              आपल्या आईच्या नावाने काढलेला हा कवितासंग्रह कवीचे आई वरील प्रेम व्यक्त करणारा असून इतरांस यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. संजय राळे यांचे कार्य इतर शिक्षकांना ही मार्गदर्शक आहे असे मा. दिलीपराव मोहिते यांनी नमूद केले.       आमदार मा.

नवीन ग्रंथालयांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरूवात करणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१६:-वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आणि गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचविण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्विकारण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठीचे अर्ज स्विकारण्यास सुरूवात करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित पुणे जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, उपायुक्त राजेंद्र मुठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, उद्यम बँकेचे संचालक संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते. मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांमध्ये वाचनाची आवड आहे,  त्यांच्यापर्यंत चांगली पुस्तके पोहोचविल्यास वाचनाकडे वळतील. त्यामुळेच गाव तेथे ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात

राज्यात १ लाख २१ हजार युवक, युवतींना उद्योग, कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार ; उद्योगांनी आता कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १६ : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराची उपलब्धता व्हावी यासाठी आज राज्यातील ४४ नामांकीत उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील १ लाख २१ हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सामंजस्य करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उद्योगांनी आता त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ सुलभतेने मिळू शकेल, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदी

नवमहाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक अशो ठाणगे यांना "आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण " पुरस्काराने सन्मानित

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी _ उत्तम खेसे खराबवाडी :- नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडीचे हिंदी भाषा विषयाचे शिक्षक श्री अशोक भागाजी ठाणगे सर यांना विश्वस्तरीय हिंदी भाषा विकास, प्रचार, संवर्धन आणि  अनुसंधान कार्यात काम करताना त्यांनी  शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याने त्यांना सन २०२२ मधील आंतरराष्ट्रीय हिंदी 'भाषा भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी काठमांडू-नेपाळ येथे संपन्न झालेल्या नेपाळ-भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनाचे कार्यक्रमात श्री अशोक ठाणगे सर   यांना संमेलन समिती प्रमुख विजयकुमार तिवारी, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलानी, स्वागताध्यक्षा नेपाळ डॉ. संगीता ठाकुर, प्रमुख संयोजक कैलास जाधव, प्रमुख संयोजक नेपाळ डॉ. राधेशाम  ठाकूर यांचे हस्ते आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार देऊन येथोचित सन्मानित करण्यात आले. नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडीचे शिक्षक श्री अशोक ठाणगे सर यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व  आहे.तसेच त्याना राज्यस्तरीय गोवा येथे " भाषारत्न पुरस्कार" मिळाला. खेड येथे मुख्या ध्यापक संघ यांच्या वती

जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१४- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार  पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नेस वाडिया महाविद्यालयात शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती  तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारणाचे कार्यकारी अध्यक्ष संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी   मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती  माधव जे. जामदार, न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक आदी उपस्थित होते. यावेळी श्री नवलमल फिरोदिया विधि महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी 'मोटार वाहन कायदा व्यवस्था' विषयावरील  नाटिका प्रस्तूत करुन लोकन्यायालयाचे तसेच विधि साक्षरतेचे महत्त्व सांगितले.  महामेळाव्यामध्ये विविध शासकीय योजनांचे ७० स्टॉल्स होते. यात निवडणूक शाखा, महसुल विभाग, अन्नधान्य वितरण कार्यालय , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक विभा

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेट

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.१४: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज बालेवाडी येथील आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेट दिली. आर. के. लक्ष्मण यांच्या समृद्ध कलेचा हा ठेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले. यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, आर. के. लक्ष्मण यांचे सुपुत्र श्रीनिवास लक्ष्मण, स्नुषा उषा लक्ष्मण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वत: तिकीट घेऊन संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालय उत्तम पर्यटनस्थळ व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे नमूद करून यावेळी श्री. पाटील म्हणाले, आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांद्वारे कलेसोबत आशय स्पष्ट व्हायचा. वाचक केवळ त्यांची व्यंगचित्रे पाहण्यासाठी वृत्तपत्र घेत असत. त्यांच्या व्यंगचित्रांना, त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांना एकाच ठिकाणी पाहता यावे अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यानुसार ही सर्व व्यंगचित्रे सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी बघता यावी यासाठी संग्रहालयाची उभारणी करण्यात आली

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि १४: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लिलावाचे डीडी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.  त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल.  दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुप

औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१४: औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील महिला व युवक तसेच ‘सारथी’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे येत्या १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील तसेच ‘सारथी’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.  सुरुवातीला अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, फील्ड टेक्निशियन- एसी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आह

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.१४: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदवलेल्या आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत ३ लाख १५ हजार रुपये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येतात.  स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये ३ लाख ५० लाख हजार  राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. ठरवून दिलेल्या उद्द

भैरवनाथ विद्यालय किवळे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे   खेड:   २००१च्या बॅचचा स्नेह मेळावा कडूस येथील मैत्री हिल्स रिसॉर्ट येथे पार पडला. बावीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकत्र जमले एकत्र येणे कामी अरुण कोंढेकर व सलीम शेख व राणी साळुंके यांनी प्रयत्न केले .    ग्रुपमधील काहीजण शिक्षक कंपनी कामगार तर काही उद्योजक बनले तर काही शेती करतात विद्यालयातील गमती जमती सांगुन पुढील येणाऱ्या काळात आशाच प्रकारे दरवर्षी एकत्र येवून विद्यालयासाठी व गरीब विद्यार्थ्यांसाठी व प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा माणस या वेळी व्यक्त करण्यात आला . प्रथम सरस्वतीचे पुजन करून विद्यालयातील मुख्याध्यापक रामदास साळुंके व शिक्षक लतिफ शेख गणपत भूजबळ खंडेराव अरगडे विलास दौंडकर यांचा शाल श्रीफळ व एक ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले व पुढील वर्षी मुख्याध्यापक साळुंके सर निवृत्त होतात त्यांच्या कार्यक्रमास पुन्हा एकदा मेळावा घेण्याचे निश्चित केले नंतर सुरुची भोजन केले व मैत्री हिल्स चा परिसर स्विमींग पुल येथे ग्रुप फोटो काढून दिवसभर आनंद साजरा केला . सलीम शेख यांनी सूत्रसंचलन केले तर रव

राष्ट्रीय लोक अदालतीत ६६ हजार प्रलंबित दावे निकाली काढून पुणे राज्यात प्रथम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे,दि.१३: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६६ हजार ४३९ प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली १ हजार ४०६, तडजोड पात्र फौजदारी ६ हजार १८६, वीज देयक ३६८, कामगार विवाद खटले १३, भुसंपादन ८८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १३६, वैवाहिक विवाद १४४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ५११, इतर दिवाणी ३८४, महसूल ५ हजार १४, पाणी कर ४९ हजार २६१, ग्राहक विवाद २८ आणि इतर १ हजार ९०० प्रकरणे अशी एकूण ६६ हजार ४३९ निकाली काढण्यात आली आहेत. तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ६६ हजार ७४१ प्रलंबित प्रकरणांमधून ९ हजार ६७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ७१ कोटी २९ लाख तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लाख २८ हजार ५४६ दाव्यापैकी ५६ हजार ७६६ दावे निकाली काढण्यात येऊन ६८ कोटी ७३ लक्ष रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ६६ हजार ४३९ दावे निकाली काढण्यात येऊन १४० कोटी २ लक्ष रुपये तडजोड शु

बीड हिवताप कार्यालयातील बोगस हंगामी फवारणी कर्मचारी ६९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे : हिवताप कार्यक्रमात सन २०२१ मध्ये बहुउद्देशीय आरोग्य  कर्मचारी यांच्या पद भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या   एकूण ६९ उमेदवारांचे प्रमाणपत्र चौकशीअंती  जणांचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यानंतर शासनाने उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांना गुन्हे दखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.त्या अनुषंगाने आज   शिवाजीनगर पोलिस स्टेशन , बीड येथे एकूण ६९ जणांवर विहित कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.  या प्रकरणात संबंधितांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र कोणत्याही पदभरतीमध्ये व शासकीय कामकाजामध्ये वापरले जाणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत.  नोकरीसाठी चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली तर याची गंभीर दखल घेतली जाईल व बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यानंतर सक्त कारवाई करण्यात येईल तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्वरित गंभीर दखल घेऊन त्यावर नियमानुसार कठोर कार्यवाही केली जाईल तसेच या  बनावट प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तींचा सहभाग आ

भोर तालुक्यातील स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाचा एल.ई.डी. बल्ब प्रकल्प पथदर्थी- अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे, दि.१२: स्वप्नपुर्ती महिला ग्रामसंघाने राबविलेला एल.ई.डी. बल्ब निर्मिती प्रकल्प पथदर्शी असून येत्याकाळात राज्यात एक मोठा उद्योग समूह म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक गावातील महिलांपर्यंत अशा स्वरूपाचे नावीन्यपूर्ण उपक्रम पोहचवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.  भोर तालुक्यात खोपी गावातील स्वप्नपूर्ती महिला ग्रामसंघाच्यावतीने राबविण्यात उपक्रमांना दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, मिलिंद टोणपे, भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय धनवटे, पेसाचे सहसंचालक विक्रांत बगाडे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ आणि महिला बचत गटातील सदस्या उपस्थित

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश'चे प्रकाशन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.११-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च संस्थेतर्फे प्रकाशित ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जीवनाच्या विविध क्षेत्रात एकरूपता आणून भारताचा विश्वकल्याणाचा शाश्वत विचार जगाला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे श्री.कोश्यारी यावेळी म्हणाले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला दत्तात्रय होसबळे, नंद कुमार, रवी देव, प्रशांत साठे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद शब्दाचा उपयोग केला. समग्र जगाच्या कल्याणासाठी सर्व विचारांच्या साररूपाने हा विचार मांडला आहे. भारताचा जगतकल्याणाचा विचारच शाश्वत विचार आहे. आपली या विचारावर दृढ श्रद्धा असली तर जगाला मानवकल्याणाचा संदेश प्रभावीपणे देत येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.होसबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. ग्रंथाचे संपादक रवींद्र महाजन यांनी ग्रंथ निर्मितीतील विविध टप्प्यांची माहिती दिली.  सीआयएसआरच्या हरिभाऊ मिरासदार यांनी प्रास्ताविकात ग्रंथलेख

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ; जनुकविज्ञानाच्या अभ्यासातून भविष्यातील पिढ्या वाचवण्याचे पवित्र काम- राज्यपाल

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. 11: जनुकविज्ञानाच्या (जेनेटिक सायन्स) माध्यमातून केवळ आजारांचे निदान करणे एवढेच नाही तर आजारांची कारणे आणि त्यावरील उपचार शोधणे आदी सर्व बाबी करुन भविष्यातील अनेकाअनेक पिढ्या वाचवण्याचे अत्यंत पवित्र काम केले जाते, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या (एमयुएचएस) पुणे विभागीय केंद्राने उभारलेल्या डॉ.घारपुरे स्मृती जेनेटिक प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्राचे (जीन हेल्थ) उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर (से. नि.), राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन ॲण्ड लॅबारेटरीचे चेअरमन सुहास जोशी, विद्यापीठाचे प्रति कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते. सर्व नवीन ज्ञान हे अंतिमत: प्रयोगशाळेत निर्माण होते अशी आपली भावना असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, पूर्वी वैद्य प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा वापर करुन स्वत: निदान