शिराळा नगरपंचायत मार्फत नव्याने श्रमदानास सुरुवात

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी / विशाल खुर्द



 शिराळा दि.२०,   शिराळा शहराला स्वच्छ, सुंदर,हरित, पर्यावरण पूरक शहर अशी नवीन ओळख मिळवून देऊन शहराचा शाश्वत विकास व्हावा या हेतूने शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत विविध उपक्रम नित्यनेमाने राबविले जातात. त्यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे श्रमदान. मागील दोन वर्षापासूनच शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतूनच आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी शहरात नागरिक संस्था यांच्या सहभागातून विविध सार्वजनिक ठिकाने स्वच्छ करणे व इतर पर्यावरण जतन व संवर्धनाची कामे केली जातात. 

या श्रमदानांतर्गत आज दिनांक१८/११/२०२२ रोजी शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत कार्यालयाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या वर्षी पावसाच्या कालावधीत   लागवड करण्यात आलेल्या विविध जाती व प्रजातींच्या वृक्षाच्या मशागतीसाठी श्रमदान केले. या श्रमदानात नगरपंचायत पथकामार्फत सर्व झाडांना  पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होण्याच्या हेतूने गोलाकार आळी करणे, झाडांच्या निर्जीव फांद्या छाटणे, झाडांना आधारासाठी बांबू काठी बांधणे,  झाडाच्या बुंध्यातील गवत काढणे, झाडाच्या परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करणे अशी कामे करण्यात आली.यापुढेही दर शुक्रवारी श्रमदान उपक्रम नित्यनेमाने सुरु ठेवण्यात येणार असल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी शहरातील नागरिक व संस्थानाही या अभियानात सहभागी होवून शहराच्या हरित वाटचालीत आपले अनमोल योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात