जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पुणे दि.१४- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार  पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नेस वाडिया महाविद्यालयात शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती  तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारणाचे कार्यकारी अध्यक्ष संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.


यावेळी   मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती  माधव जे. जामदार, न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक आदी उपस्थित होते.


यावेळी श्री नवलमल फिरोदिया विधि महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी 'मोटार वाहन कायदा व्यवस्था' विषयावरील  नाटिका प्रस्तूत करुन लोकन्यायालयाचे तसेच विधि साक्षरतेचे महत्त्व सांगितले.


 महामेळाव्यामध्ये विविध शासकीय योजनांचे ७० स्टॉल्स होते. यात निवडणूक शाखा, महसुल विभाग, अन्नधान्य वितरण कार्यालय , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक विभाग, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग , समाज कल्याण आयुक्तालय, महिला बाल विकास विभाग पुणे महानगरपालिका, पुणे आणि हवेली तहसील कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरोसा विभाग, वाहतुक विभाग, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, कृषी विभाग, हवेली, आरोग्य विभाग पुणे, महावितरण, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, एस. टी. महामंडळ विभाग, भू-संपादन कार्यालय, कुळकायदा विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, धर्मादाय आयुक्त कार्यालय, वाडीया महाविद्यालय, बजाज विमा कंपनी, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यु.सी.ओ बँक, जनसेवा फाऊंडेशन आणि लायन्स क्लब अशा विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला.


लाभार्थ्यांना  न्यायमूर्तींच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.  स्टॉल्सच्या माध्यमातुन १ हजार ३७५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.  कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरण पुणे यांनी यावर्षी केलेल्या कामाच्या "सेवा  कार्य वृत्त" पुस्तिकेचे प्रकाशन न्यायमूर्ती  गंगापूरवाला यांच्या हस्ते करण्यात आले.


 जिल्हा न्यायाधीश के. पी. नांदेडकर,  एस. जी. वेदपाठक,  ए. एस. वाघमारे ,  ए. एन. मरे , एस. बी. हेडाव,  एस. आर. नावंदर, जे. एन. राजे, बी. पी. क्षीरसागर, के. एन. शिंदे तसेच सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.


जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सदस्य सचिव मंगल  कश्यप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात