नवमहाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक अशो ठाणगे यांना "आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण " पुरस्काराने सन्मानित
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी _ उत्तम खेसे
खराबवाडी :- नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडीचे हिंदी भाषा विषयाचे शिक्षक श्री अशोक भागाजी ठाणगे सर यांना विश्वस्तरीय हिंदी भाषा विकास, प्रचार, संवर्धन आणि अनुसंधान कार्यात काम करताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याने त्यांना सन २०२२ मधील आंतरराष्ट्रीय हिंदी 'भाषा भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी काठमांडू-नेपाळ येथे संपन्न झालेल्या नेपाळ-भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनाचे कार्यक्रमात श्री अशोक ठाणगे सर यांना संमेलन समिती प्रमुख विजयकुमार तिवारी, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलानी, स्वागताध्यक्षा नेपाळ डॉ. संगीता ठाकुर, प्रमुख संयोजक कैलास जाधव, प्रमुख संयोजक नेपाळ डॉ. राधेशाम ठाकूर यांचे हस्ते आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्कार देऊन येथोचित सन्मानित करण्यात आले.
नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडीचे शिक्षक श्री अशोक ठाणगे सर यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे.तसेच त्याना राज्यस्तरीय गोवा येथे " भाषारत्न पुरस्कार" मिळाला. खेड येथे मुख्या ध्यापक संघ यांच्या वतीने पण "आदर्श शिक्षक" पुरस्कर प्राप्त झालेला आहे. सध्या ते खेड तालुका हिंदी संघ चे अध्यक्ष म्हणून काम करतात.
यांना गौरविताना मान्यवर नवमहाराष्ट्र विद्यालय चे शिक्षक अशोक ठाणगे यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हिंदी भाषाभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याने त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश कड सर तसेच शाळेचे अध्यक्ष प्रकाश खराबी सचिव गोरक्षनाथ कड सर्व संचालक मंडळ शिक्षक, सर्व कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि खेड तालुक्यात सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा