राष्ट्रीय बालदिनानिमित्त राष्ट्रपती भवन येथे मॉडर्न हायस्कूल भोसे येथील विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन साधला संवाद
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / रोहन सांवत
भोसे(ता.खेड ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भोसे ते दिल्ली अशा ऐतिहासिक सहलीचे भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजन केले होते . राष्ट्रपती भेटीसाठी राष्ट्रपती कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला होता .शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य ,स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश ,शाळेचे १००%निकाल या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रपतींनी भेटीचे आमंत्रण प्रशालेस दिले.शिक्षक व विद्यार्थ्यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून विमानाने प्रवास करून भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.देशभरातून १०० शाळांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे या एकमेव शाळेची निवड करण्यात आलेली होती.यावेळी प्रशालेतील श्वेता जाधव , जानवी कुटे , समिक्षा कुटे,प्रणाली कोळी,आर्यन गांडेकर, नैतिक गायकवाड,ओंकार चितळे, शुभम गांडेकर या आठ विद्यार्थ्यांनी व चतुर पाटील , योजना कुटे ,कैलास निळकंठ ,हनुमंत तापकीर , आंबवणे , रुपाली कोळेकर , शितल हिंगे ,ऐश्वर्या वायभासे ,रोहन सावंत या शिक्षकांनी राष्ट्रपतींची भेट घेतली . विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करून मनमोकळेपणाने संवाद साधला. राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा शाळेविषयी ,संस्थेविषयी मोठ्या आपुलकीने विचारपूस केली .भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट अनुभवताना विद्यार्थी विलक्षण आनंद झाले .
बालपण हा आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा असतो.मुले ही आहेत तशी स्वतःला स्वीकारतात .यामुळेच ती चैतन्यदायी असतात. मुलांची हीच निरागसता आणि पावित्र्य आज आपण साजरे करत आहोत,असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या .
मोठी स्वप्ने पहा आणि नवीन तसेच विकसित भारताची स्वप्ने पहा असा उपदेश राष्ट्रपतींनी केला.आज पाहिलेली स्वप्ने उद्या सत्यात उतरू शकतात,असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला .
या ऐतिहासिक क्षणासोबतच विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवन संग्रहालय ,लालकिल्ला,कुतुबमिनार ,लोटस टेंपल ,राजघाट ,इंदिरा गांधी शक्तीस्थळ ,अक्षरधाम या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली .
अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश भालचंद्र गवळी यांनी दिली. या ऐतिहासिक सहलीसाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे यांनी मार्गदर्शन केले.बाल दिनानिमित्त राष्ट्रपतींशी झालेली भेट ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मर्म बंधातील ठेव ठरली अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा