बीड हिवताप कार्यालयातील बोगस हंगामी फवारणी कर्मचारी ६९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


 पुणे : हिवताप कार्यक्रमात सन २०२१ मध्ये बहुउद्देशीय आरोग्य  कर्मचारी यांच्या पद भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या   एकूण ६९ उमेदवारांचे प्रमाणपत्र चौकशीअंती  जणांचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यानंतर शासनाने उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांना गुन्हे दखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.त्या अनुषंगाने आज   शिवाजीनगर पोलिस स्टेशन , बीड येथे एकूण ६९ जणांवर विहित कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.


 या प्रकरणात संबंधितांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र कोणत्याही पदभरतीमध्ये व शासकीय कामकाजामध्ये वापरले जाणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत.


 नोकरीसाठी चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली तर याची गंभीर दखल घेतली जाईल व बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यानंतर सक्त कारवाई करण्यात येईल तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्वरित गंभीर दखल घेऊन त्यावर नियमानुसार कठोर कार्यवाही केली जाईल तसेच या  बनावट प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तींचा सहभाग आहे त्या सर्व व्यक्तींवर  कार्यवाही केली जाईल व कोणाचीही गय केली जाणार नाही   असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .


या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात