सुलाईया दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा आमदार दिलिप मोहिते यांच्या हस्ते संपन्न

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी /लतिफ शेख



खेड दि.१८, 'मनस्पंदनकार ' कवी, लेखक प्रा. श्री. संजय राळे पाटील यांच्या ' सुलाई' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे  प्रकाशन मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी खेड तालुक्याचे  आमदार मा.श्री. दिलीप अण्णा मोहिते पाटील, पारनेरचे आमदार मा.श्री. निलेशजी लंके तसेच मॉरिशस मराठी संस्कृती केंद्राचे अध्यक्ष मा. अर्जून पुतळाजी यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती मा. रमेश शेठ राळे पाटील, मा. चंद्रकांत दादा इंगोले (मा. सभापती),  आभाळाखालची शाळा या जागतिक उपक्रमाचे अध्यक्ष मा. दिलीप पुराणिक, सौ. सुरेखा ताई मोहिते पाटील, महाळुंगे गावच्या सरपंच सौ. मंगलाताई भोसले तसेच पुणे जिल्ह्यातील शिक्षकवृंद, महिला आघाडी, कला- साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

            आपल्या आईच्या नावाने काढलेला हा कवितासंग्रह कवीचे आई वरील प्रेम व्यक्त करणारा असून इतरांस यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. संजय राळे यांचे कार्य इतर शिक्षकांना ही मार्गदर्शक आहे असे मा. दिलीपराव मोहिते यांनी नमूद केले.

      आमदार मा.निलेश लंके यांनी आईच्या नावाने काढलेल्या या काव्यसंग्रहाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. 

           प्रत्येकाचीच आई ही शिवरायांची आई नसते किंवा श्यामची आई ही नसते. पण ती आपल्या मुलांची आई असते. आई वडिलांचे संस्कार मुलांना घडवत असतात. तसेच मलाही त्यांनी घडविले. त्यांचे ऋण हे कधीही न फिटणारे असतात. विविधतेने नटलेला हा काव्यसंग्रह नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल असे मत कवी संजय राळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. 

    डॉ.संजीवनी लांजेवार यांच्या मी आणि... या लघुकथा संग्रहाचे ही या वेळी प्रकाशन करण्यात आले. 

       या वेळी मॉरिशस येथे मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या मा.अर्जून पुतळाजी आणि आभाळाखालची शाळा चालवून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या दिलीप पुराणिक यांच्या कार्याचाही गौरव मान्यवरांनी केला.  मा. आमदार निलेश जी लंके यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल पाकिस्तानमधील मराठी नागरिकांकडून विशेष मानपत्र  प्रदान करण्यात आले.   यावेळी मॉरिशस मधील कलाकारांनी मराठी गीतांवर बहारदार नृत्याचा कार्यक्रम सादर केला. तसेच कु. स्वप्ना पुराणिक यांचा वऱ्हाड निघालय लंडनला हा एकपात्री प्रयोग रसिकांचे मनोरंजन करून गेला. म्हाडा फेज  2 मधील युवक वर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. मा. स्वप्नील पुराणिक यांनी प्रास्ताविक केले, व दिलीप पुराणिक यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात