अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष व अजिंक्य रिक्षा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष शिवाजी काशिनाथ सल्ले यांचे निधन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / संदीप जगताप वडकीगाव : शिवाजी काशिनाथ सल्ले, मुळगाव - नरसिंहपूर, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे. सध्या राहणार वडकीनाला, पुणे सासवडरोड, ता. हवेली, जि. पुणे. यांचे सोमवार दिनांक २४ /१०/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता अकस्मात दुःखद निधन झाले. ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली, १ मुलगा, नातवंड असा मोठा परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्याने सल्ले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २०१६ पासून ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष होते. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजूसाहेब शिंगाडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "इंदापूर येथे पत्रकार संघाचे त्यांचे काम खूपच प्रभावी होते. इंदापूर मधून सध्या जनलोक वार्ता आवृत्ती प्रकाशित होते, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. खूपच सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्तिमत्व पत्रकार संघातून अचानक गेल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार सदस्य व पदाधिकारी यांना खूपच दुःख झाले आहे. इंदापूर येथील त्यांच्या कार्य करण्याच्या