सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पुणे दि.१४: सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचे मनोगत, तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्रे वाटप,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि शासकिय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 



कार्यक्रमाचे शासकिय वसतिगृहे व निवासी शाळेत प्रवेशितांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती तसेच सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेबाबतच्या इतिहासाची माहिती देण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात