अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष व अजिंक्य रिक्षा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष शिवाजी काशिनाथ सल्ले यांचे निधन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

           

प्रतिनिधी / संदीप जगताप    


 

 वडकीगाव : शिवाजी काशिनाथ सल्ले, मुळगाव - नरसिंहपूर, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे. सध्या राहणार वडकीनाला, पुणे सासवडरोड, ता. हवेली, जि. पुणे. यांचे सोमवार दिनांक २४ /१०/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता अकस्मात दुःखद निधन झाले. ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली, १ मुलगा, नातवंड असा मोठा परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्याने सल्ले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २०१६ पासून ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष होते. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजूसाहेब शिंगाडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "इंदापूर येथे पत्रकार संघाचे त्यांचे काम खूपच प्रभावी होते. इंदापूर मधून सध्या जनलोक वार्ता आवृत्ती प्रकाशित होते, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. खूपच सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्तिमत्व पत्रकार संघातून अचानक गेल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार सदस्य व पदाधिकारी यांना खूपच दुःख झाले आहे. इंदापूर येथील त्यांच्या कार्य करण्याच्या कामाची जागा भरून निघणे अशक्यच आहे". अशी भावना पत्रकार संघाचे संस्थापक राजूसाहेब शिंगाडे यांनी व्यक्त केली. सल्ले परिवाराच्या दुःखामध्ये  त्यांच्या गावातील नरसिंहपूर, बावडा व इंदापूर मधील सल्ले परिवार, नगरे परिवार, काची परिवार, दरदरे परिवार, बोजवारे परिवार व दुसाने परिवार सहभागी आहेत.  ते अजिंक्य रिक्षा संघटनेचेही पुणे शहराध्यक्ष होते. पुणे शहरात व जिल्ह्यामध्ये अजिंक्य रिक्षा संघटना वाढवण्यासाठी त्यांनी खूपच मेहनत घेतली. अजिंक्य रिक्षा संघटनेचे संस्थापक नितीनभाऊ भुजबळ यांनी यांच्या दुःखद निधनाने शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “शिवाजी सल्ले यांनी अजिंक्य रिक्षा संघटनेसाठी खूपच कष्ट केले. अजिंक्य रिक्षा संघटना म्हटले की शिवाजी सल्ले यांचे नाव प्रथम येत होते. त्यांच्या दुखद निधनाची बातमी कळल्यावर प्रथम विश्वासच बसला नाही. शिवाजी सल्ले यांच्या दुःखात अजिंक्य रिक्षा संघटनेचे सर्वच सदस्य व पदाधिकारी असून त्यांच्या कुटुंबीयांसोबत व त्यांचा मुलगा मनोज शिवाजी सल्ले व त्यांच्या कुटुंबिया सोबत आम्ही सदैव उभे आहोत". अशी भावना नितीन भाऊ भुजबळ यांनी व्यक्त केली. अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजूसाहेब शिंगाडे, वडकी गावचे माजी सरपंच बापूसाहेब मोडक, पत्रकार संघाचे संदीप जगताप, दिलीप मेमाणे व गणेश मोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व शिवाजी सल्ले यांच्या सावडण्याच्या विधीसही उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात