फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद; ३ हजार २२४ नोंदी निर्गत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

पुणे दि.१३: सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीला जिल्हयात  चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ३ हजार २२४ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या.


            राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.


            त्यानुसार बुधवार १२ ऑक्टोबर रोजी आयोजित  फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून या फेरफार अदालतीमध्ये साध्या २ हजार ५८७ , वारस ४८७  आणि तक्रारी १५० अशा एकूण ३ हजार २२४ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.


*बारामती तालुक्यात सर्वाधिक फेरफार नोंदी निर्गत*

            बारामती तालुक्यात सर्वाधिक  ६४६ तर शिरूर तालुक्यात ४१७ नोंदी निर्गत करण्यात आल्या. हवेली तालुक्यात २६७, पिंपरी चिंचवड १५७,  आंबेगाव २४६, जुन्नर २३९,  इंदापूर ३४४, मावळ १९६, मुळशी १३४, भोर १०८, वेल्हा ७०, दौंड ६९,  पुरंदर ११४ आणि खेड तालुक्यात २२६ फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात