जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये ; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


मुंबई, दि. २० - जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.  


आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. 


कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी  वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल 

आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी  रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.  २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक  स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात