बांबवडे येथे आईचे उत्तरकार्य रोपे भेट देऊन संपन्न, पाटील कुटुंबियांचा अनोखा उपक्रम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



शिराळा (प्रतिनिधी), बांबवडे ता. शिराळा येथील प्राथमिक शिक्षक नंदकुमार पाटील यांच्या मातोश्री फुलाबाई बापू पाटील यांच्या उत्तरकार्य प्रसंगी उपस्थित पाहुणे, मित्र यांना आंबा, चिकू, पेरू, शोभेची झाडे देऊन साजरा करण्यात आला.


या प्रसंगी नंदकुमार पाटील म्हणाले, आपण पर्यावरणाचे देणे लागतो.माझ्या आईच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने पर्यावरण चांगले राहण्यासाठी माझ्या आईचा खारीचा वाटा राहील.


या कार्यक्रमांस गावातील नागरिक तथा महेश शरनाथे, नाना गायकवाड, आर. सि. पाटील, अनंत सपकाळ, अमोल जाधव,शिक्षक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील कुटुंबियांकडून उपस्थिताचे आभार मानले.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद