फेब्रुवारी २०२३ दरम्यान शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / उत्तम खेसे
पुणे : शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) १७ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन घेण्याची तयारी करण्यात येत आहे. परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यापैकी एका संस्थेची निवड केली जाणार आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या संस्थेकडून १६ डिसेंबरच्या आसपास परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून परीक्षेचा निकाल ५ मार्च २०२३ ला जाहीर करण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर ही परीक्षा होणार आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी अनुदानित, विनाअनुदानित,अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्येच घेण्यात आला. त्यासाठी 'पवित्र' पोर्टल तयार करण्यात आले. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे शक्यता आहे
स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर २०१७ नंतर राज्यात पुन्हा कधीही ही परीक्षा झाली नाही. परीक्षा ऑनलाइन घेण्याची यंत्रणा 'राज्य परीक्षा परिषदे' कडे नाही. त्यामुळे या पूर्वीच्या पद्धतीनेच फेब्रुवारीमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल.
राज्य परीक्षा परिषदेकडे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची जबाबदारी आहे. या परीक्षेच्या निकषांत सुधारणा करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या संस्थांकडून परीक्षेच्या आयोजनाचे सादरीकरण या पूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला १७ ऑक्टोबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा