पोस्ट्स

पश्चिम महाराष्ट्रात कुठेही विज यंत्रणा बिघडलेली दिसल्यास कळवा या व्हाट्सअप नंबरवर ; महावितरणाकडून आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे ( प्रतिनिधी ) :  पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉट्सॲप द्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी 7875440455, कोल्हापूर- 7875769103, सांगली- 7875769449 आणि सातारा जिल्ह्यासाठी 7875768554 हा व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे न

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० नोव्हेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १७ : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे  सोमवार  २० नोव्हेंबर  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने दिली आहे.  महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाकरिता करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज संबधितांनी दोन प्रतीत करावे. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असावे. अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या १५  दिवस अगोदर पाठवावे. अर्ज सादर केल्यानंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अर्जासेाबत जोडलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.  न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमून्यात नसणारे, आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबींचे अर्ज, तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरूपात नसतील तर अशी प्रकरणे महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.

स्वाधार योजनेसाठी संपूर्ण 150 कोटी निधी वितरीत

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 17 : स्वाधार योजनेसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला १०० टक्के निधी म्हणजेच १५० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाने वितरीत केला आहे. यापूर्वी या योजनेसाठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला असून कालच उर्वरीत ४५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.             मागासवर्गीय मुलामुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहांची योजना राबविण्यात येते. राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहे असून त्यामध्ये मुलांची २२९ व मुलींसाठी- २१२ वसतीगृहे सुरू आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपल

ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार -मंत्री चंद्रकांत पाटील

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 17 : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची 100 टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.             मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची तसेच  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच सारथी महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन, अण्णासाहेब पाट

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु ; आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप- मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. 17 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली. त्याचबरोबर बैठकीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.             खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती.  आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत.  राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.              प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजा

मतदार नोंदणीकरिता आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद ; जिल्हाधिकाऱ्यांची कँटोन्मेंट मतदार संघाला भेट

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ४: मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातील सेंट मिराज हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.   जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात ४ व रविवार ५ नोव्हेंबर आणि २५ व २६ नोव्हेंबर या शनिवार व रविवारच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज सर्व मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) उपस्थित राहून मतदार नोंदणी, वगळणी, नोंदीच्या तपशीलातील बदल आदींचे नागरिकांचे, नवमतदारांचे अर्ज स्वीकारले.  ठिकठिकाणी संबंधित मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन बीएलओच्या कामाची पाहणी करून मार्गदर्शन केले. पुणे कँटोन्मेट मतदार संघाला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी नवमतदारा

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम ;मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. ३: मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी यांची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिन्याभरात ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  वर्षा निवासस्थानी मुख्यमंत

कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.३: कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता आयोजक स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धांसह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना २० हजार रुपये व सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति पात्र जोडपे ४ हजार रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.  सामूहिक विवाह सोहळे स्वयंसेवी संस्थांबरोबर केंद्र, राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय तसेच सार्वजनिक प्राधिकरणे, जिल्हा परिषद आदींना आयोजित करता येतील. त्यांना स्वयंसेवी संस्थेप्रमाणे अटी लागू राहतील. स्वयंसेवी संस्थेनी विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा- ०६

माजी सैनिकांना संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३:  माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी राज्य सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. राज्य सैनिक कल्याण विभागाच्या आदेशानुसार माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करतेवेळी डिस्चार्ज बुक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, निवृत्तीचेतन बँक खाते, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इसीएचएस कार्ड, राहत्या पत्त्याचा पुरावा, डोमासाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, लागू असल्यास नाव जन्मतारीख बदलाबद्दल पत्र आदी कागदपत्रे जवळ ठेवावीत, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (निवृत्त) यांनी कळविले आहे.

युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत जबलपूर येथे अग्नीवीर आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३: युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत १ सिग्नल प्रशिक्षण केंद्र, जबलपूर येथे ७ ते १०  नोव्हेंबर या कालावधीत अग्नीवीर आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.  आयोजित करण्यात आलेला अग्नीवीर भरती मेळावा हा माजी सैनिकांच्या पाल्यासाठी असून जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टिनंट कर्नल हंगे स. दै. (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३: चालू रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. रब्बी ज्वारी या पिकासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन http://pmfby.gov.in या पार्टलवर स्वत: शेतकरी, बँक, विमा कंपनी अथवा सामुहिक सेवा केंद्रामार्फत नोंदणी करता येईल. योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रत्येक अर्जासाठी ४०

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यशाळा संपन्न

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. ३१ : समाज कल्याण विभागाच्यावतीने भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत जिल्ह्यातील महाविद्यालयांची कार्यशाळा पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.  कार्यशाळेमध्ये स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती या योजनांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करुन प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या. सन २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंतचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, शैक्षणिक वर्ष सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेचे अर्ज भरून घ्यावेत व शिष्यवृत्ती प्रलंबित असताना महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.  महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्र अथवा शिष्यवृत्ती शाखेने विद्यार्थ्यांच्या महा-डीबीटी व स्वाधार योजनेसंदर्भातील शंकाचे निरसन तेथेच करावे. समाज कल्याण विभागाच्या सूचनांचे प

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला ; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि. ३१, मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरु असून अशा नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यास देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या नोंदी तपासताना मोडी आणि उर्दू भाषेतील दस्तावेज आढळून आला.  या कागदपत्रांचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजिटाईज करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास देखील आज मान्यता देण्यात आली.   न्या. शिंदे यांच्या अहवालातील शिफारशींनुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीचा अव

अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ संलग्न जनलोक वार्ता समिती निवडणूक 2023 चा निकाल जाहीर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क        सासवड (झेंडेवाडी)  : दि. २९, सासवड येथील झेंडेवाडीत सदस्य गणेश जाधव यांच्या फार्म हाऊसवर  अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ संलग्न जनलोक वार्ता समिती महाराष्ट्र प्रदेश व पश्चिम महाराष्ट्र निवडणूक 2023 चा निकाल अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक राजूसाहेब शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महिला अध्यक्षा व निवडणूक अधिकारी सोनाली जगताप व अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे  खेड तालुकाप्रमुख व निवडणूक अधिकारी लतीफ शेख यांनी जाहीर केला. जनलोक वार्ता समिती ची दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीचे पदाधिकारी यांची निवडणूक रविवार दिनांक २९ रोजी झाली व त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.  या निवडणुकीत विजयी पदाधिकारी उत्तम खेसे, राजगुरूनगर. ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ), संतोष गाडेकर राजगुरुनगर. ( महाराष्ट्र प्रदेश सचिव ), चंद्रकांत सलवदे, पुणे. ( महाराष्ट्र प्रदेश खजिनदार ), अमोल जाधव,  इस्लामपूर. ( महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ), विशाल खुर्द, शिराळा. ( महाराष्ट्र प्रदेश उपकार्याध्यक्ष ),  रणजित चव्हाण, शिराळा. ( पश्चिम म

लसीकरणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: नियमित लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी पुण्यातील हॉटेल कॉनरॅड येथे विविध राज्यातील प्रतिनिधींच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.   युएसएआयडी द्वारे संचलित ‘मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी’ प्रकल्पाच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अशासकीय संस्था, प्रकल्प भागीदार यांनी कोविड लसीकरणाच्या व्यवस्थापनात आलेले अनुभव मांडले. या अनुभवांचा उपयोग नियमित लसीकरण मोहिमेत सातत्य राखण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी होऊ शकतो असे यावेळी सांगण्यात आले.  नियमित लसीकरण कार्यक्रम वाढीसाठी विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एनजीओच्या प्रकल्प भागीदारांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय कार्यशाळेत मांडले. या कार्यशाळेत लसीकरण कार्यक्रमाच्या शिफारसी तयार करण्यावर भर दिला गेला.    देशातील लसीकरणाला गती देण्याच्यादृष्टीने युएसएआयडीद्वारे संचलित मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी प्रकल्प हे देशभरात १८ राज्यात का

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ३०  : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'एलई' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. चारचाकी वाहन क्रमाकांची यादी २ नोव्हेंबर रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) २ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा

जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीत अपघातांच्या शास्त्रीय विश्लेषणावर भर देण्याची गरज व्यक्त ; अपघातांच्या ठिकाणी जलदगतीने रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी एसओपी बनवा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यवत (ता. दौंड), शिक्रापूर आणि रांजणगाव (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यामुळे या ठिकाणी यंत्रणांनी सुरक्षा तसेच उपाययोजनांविषयक पाहणी करावी. आवश्यक उपाययोजनांसह अत्याधुनिक जीवरक्षक साधनसामुग्री असलेल्या रुग्णवाहिका येथे जलदगतीने कशा उपलब्ध होऊ शकतील यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पुणे मनपाचे रस्ते विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, सार्व. बांध. विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक आदी उपस्थित होते. बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) करण्यात

जिल्ह्यात १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२८: पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत  ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ हजार २२३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण ५०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी केंद्र समिती स्थापन करण्यात आली आहे.  या समितीमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उप वनसंरक्षक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी  शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,  सहा.  केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी,  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त, केंद्रीय नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक, पुणे व  पिंपरी चिंचवड शहर प्रतिबंधक कक्षाचे  अधिकारी असे एकूण १

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत ;२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              पुणे, दि २८ : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळेल. येथे स्थापित होणा-या उद्योगांना महाराष्ट्र शासनाने काही  सवलती व प्रोत्साहने  सुद्धा जाहीर केली आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिली.             मंत्री  सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्र आजही थेट परकीय गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर आहे.             रत्ने व आभूषणे क्षेत्रातील केंद्र शासनाची शिखर संस्था म्हणजेच जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबई येथे स्थापित करण्यात येत आहे. या पार्कमध्ये सुमारे २ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक स्थापित होणार आहेत. तसेच येथे मोठ्या नामांकित कंपन्या सुद्धा गुंतवणूक करतील. अशा प्रकारचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे, असेही मंत्री सामंत

टाटा मोटर्स व मोईनी फाउंडेशन च्या वतीने खेड तालुक्यातील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर दि.२६ (राजगुरूनगर) :  टाटा मोटर्स ,चिंचवड .पुणे व मोईनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 25 ऑक्टोबर 2023  रोजी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी  एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बॅक्वेट हॉल राजगुरुनगर या ठिकाणी केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात  क्लासरूममध्ये एकाधिक बुद्धिमत्ता अध्यापनशास्त्राला प्रोत्साहन देणे या विषयी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करण्यांत आले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील  विविध माध्यमिक शाळांतील 42 शिक्षक उपस्थित होते.        या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रबोधिनी पुणे येथील बाल मानसशास्त्रात तज्ञ असणारे प्राध्यापक  अल्हाद कुलकर्णी व  सूरज कायगुढे   उपस्थित होते.      या प्रशिक्षणात टाटा मोटर्स चे सीएसआर हेड  मा.श्री.रोहित सर, लितेश सर आणि मयुरेश  कुलकर्णी सर सहभागी झाले होते व त्यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले व भविष्यातील विविध उपक्रमाची माहिती दिली व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न कसे होतील यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले. मोईनी फाऊडेशन चे  पदाधिकारी सुभाष

जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन ; घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले - मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. २६:-  ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे आज निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ  येथे अंत्यसंस्कार होणार आहे. ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे,  भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी  मोठी हानी आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की,  बाबा महाराजांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती.  त्यांनी  कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, असे नमूद करून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे महिला सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन ; महिला सक्षमीकरणासाठी आठ कलमी कृती कार्यक्रम गरजेचा -डॉ.नीलम गोऱ्हे

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.२३-उच्च व तंत्रशिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण' या विषयावर आयोजित महिला सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले. विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव,  शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. मंत्री  पाटील म्हणाले, महिलांना सक्षम करणे, बरोबरीचे स्थान मिळण्याची प्रक्रिया देशात पुढे जात आहे. जगातील अनेक देशात महिलांना मताधिकार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला असताना देशात स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून मताधिकार मिळाला आहे. महिलांना प्रसूती रजा, नोकरीच्

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.२३: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या नूतन इमातीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला  उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.विकासचंद्र रस्तोगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे,  प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर,  शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, डॉ.गजानन एकबोटे, माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते. नूतन कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमपणे काम होईल असा विश्वास मंत्री श्री.पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मॉडेल कॉलनी येथील पूर्वीच्या तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून तेथे उच्च शिक्षण संचालनालय कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला आवश्यक निधी देऊ - उपमुख्यमंत्री अजित पवार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१: जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल. वीज, रस्ते आदींसह जिल्हा परिषदेच्या योजनांमध्ये प्रामाणिकपणे कामे करा. जिल्हा नियोजन समितीची कामांना मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसात प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे याची दक्षता घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. जिल्हा परिषद येथे आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शालिनी कडू, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, २५१५- १५१६ जनसुविधा अनुदान अंतर्गत राज्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपये निधी अखर्चित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा निधी परत घेऊन अन्य कामांसाठी वापरता येईल असा निर्णय घेतला आहे.  जिल्हा परिषदेत विविध विकासकामांसाठ

पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकाला अभिवादन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.२१:मागील वर्षभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट वाइस एडमिरल अजय कोच्छर (एव्हिएसएमएनएम) पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कारागृह पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, बिनतारी संदेश विभाग पुणेचे पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत, राजेंद्र सिंग व अति पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे यांनी यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमीचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, कारागृह पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रविणकुमार पाटील, अरविंद चावरिया, वसंत परदेशी, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, एसआरपी पोलीस महानिरीक्षक अ

फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा - उपमुख्यमंत्री अजित पवार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१: नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी - वोघोली, सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद अशा पद्धतीच्या रस्त्यासाठी व्यवहार्यता तपासणी व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. रस्ते व मेट्रोच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते. पुणे मेट्रोद्वारे मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत नगर रोड वरील खराडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उड्डाणपुलाशी जोडणीबाबत श्री. हर्डीकर यांनी सादरीकरण केले. टप्पा-२ साठी हा विस्तृत प्रस्ताव अहवाल केला असून नगर विकास विभागाकडे पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही गतीने करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्

'७५ यशस्विनी बाईकर्स'चे शनिवार वाडा येथे स्वागत होणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २०: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' या योजनेची प्रचार प्रसिद्धी करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या '७५ यशस्विनी बाईकर्स'चे २१ ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा येथे सकाळी ९ वाजता आयोजित समारंभात स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. 'यशस्विनी' मोटारसायकल फेरीचे कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर या दरम्यान ५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.  या फेरीचा मुख्य उद्देश नारीशक्तीचे महत्व समजावून सांगणे, मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासोबत त्यांना सुरक्षित वातावरण व शिक्षण मिळणे याबाबत जनजागृती करणे आहे. फेरीमार्गावर येणाऱ्या विविध ठिकाणी किशोरवयीन मुली, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, अंगणवाडी, कर्मचारी, राष्ट्रीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी आणि निरा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २०: कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून आगामी काळात किती पाऊस पडतो याआधारे या वेळापत्रकात कमीअधीक बदल करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत निश्चित करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, संजय शिंदे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, जुलै २०२३ पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. उर्वरित पाणी रब्बी पिकांना देण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आह

सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २०: जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय स्वच्छ, सुंदर व नीटनेटके करण्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. स्वच्छता अभियान राबविण्याबाबत  दूरदृष्यप्रणाणीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्याल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.  कदम म्हणाल्या, कार्यालयातील वातावरण स्वच्छ असल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा प्रशासनास तसेच नागरिकांला लाभ होतो. पर्यायाने प्रशासन उत्तरदायी, सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होते. याचा विचार करता कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्याची कार्यवाही करावी.  कार्यालयीन वस्तू, दस्तऐवज, कपाटे सुस्थितीत ठेवा

जिल्ह्यातील ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांसह राज्यातील ५११ केंद्रांचे आज दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले; या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्यादृष्टीने उपयुक्त कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत  पुरंदर तालुक्यातील दिवे ग्रामपंचायत परिसरात  शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रांत राजपूत, गट विकास अधिकारी अमिता पवार, नागरिक, दिवे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.  जिल्ह्यात इतर ठिकाणीही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या उपस्

मावळ-मुळशी उपविभागात फटाक्यांच्या दुकानाजवळ फटाके उडविण्यास बंदी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९ : मुंबई पोलीस कायदा १९५१  च्‍या नियम ३३ (१)  (ओ) (यु) अन्‍वये उपविभागीय दंडाधिकारी  मावळ-मुळशी  यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्‍यादृष्‍टीने  शोभेची दारू व फटाके साठा केलेल्‍या दुकानापासून १००  मीटर परिसरात धुम्रपान करणे,  कोणत्‍याही  प्रकारचे दारू काम करणे, कोणत्‍याही प्रकारचे फटाके उडवणे  या सर्व गोष्टीवर बंदी  घालण्याचे आदेश दिले आहेत.   शोभेच्‍या दारू रॅकेटचे  परिक्षणदेखील या परिसरात करता येणार नाही. सदर आदेश मावळ-मुळशी उपविभागात ३  ते १५ नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करणारी व्‍यक्‍ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्‍या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील,असे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी कळविले आहे.                                   

जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट ;राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी- उद्योगमंत्री

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना  न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी असून लवकरच जनरल मोटर्स कंपनी तसेच हुंडाई कंपनीसोबत बैठक घेऊन कामगारांना वाढीव पॅकेज तसेच ज्यांना पॅकेज नको असेल त्यांच्या रोजगारासाठी निश्चित सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तळेगाव दाभाडे येथे जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेऊन श्री. सामंत यांनी शासनाची भूमिका मांडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार बाळा भेगडे, जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनचे संदीप भेगडे आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत पुढे म्हणाले, न्याय मिळण्यासाठी  एकजुटीने केलेले हे  आंदोलन आहे. कामगारांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन कंपनीला  कामगारांचा विचार करण्याबाबत स्पष्टपणे सांगितले. शासन कामगारांच्या पाठीशी आहे. पुढे जाऊन सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आ

ससून सर्वोपचार रुग्णालयास २५ लाख रुपयांच्या सोनोग्रॉफी मशीनची देणगी

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: ससून सर्वोपचार रुग्णालय येथील क्ष-किरणशास्त्र विभागात स्व. सौ. बदामीबाई जीवराजजी किताबत बाली पुणे यांच्या स्मरणार्थ किताबत कुटुंबाकडून २५ लाख रुपयांचे विप्रो जीई या कंपनीचे बोल्युसॉन पी-८ बीटी-२० सोनोग्राफी मशीन देणगी स्वरुपात देण्यात आले.  यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, विभागप्रमुख डॉ. शेफाली पवार, पुष्पा प्रकाशजी सोनव्या, दिलीप किताबत, रमेश किताबत, किरण किताबत आदी उपस्थितीत होते.   अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले, रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाची अत्याधुनिक सेवा मिळावी असा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण अत्याधुनिक उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विभागप्रमुख डॉ. पवार यांनी देणगीदारांना  सोनोग्राफी मशीन दिल्याबद्दल धन्यवाद दिले. 

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार "भाऊबीज भेट"- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी / दयानंद गौडगांव              मुंबई, दि.१८ : बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी  घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.             मंत्री  तटकरे म्हणाल्या की, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत  सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना "भाऊबीज भेट" वितरित करण्यात येणार आहे.  भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ब

दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १८ : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली, दरम्यान, दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यामाध्यमातून त्यांची सेवा करण्याकरिता कार्यरत दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.    सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक, वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली, त्यावेळी महामंडळाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.  दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन, दिव्यांग वित व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  दिव्यांग व्यक्तींसाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी फरिदाबाद येथील कंपनीकडून करण्यात येणार असून जानेव

विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १८: विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 'वाय4डी' फाउंडेशन मार्फत आयोजित इंडियाज मोमेंट कॉन्क्लेवमध्ये उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी 'वाय4डी' फाउंडेशन' चे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, हिंदुस्तान कोको कोला बिवरेजेसचे उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शनी, ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू पद्मश्री योगेश्वर दत्त, 'वाय4डी'चे सह सचिव अभिषेक तिवारी, बजाज फिन्सर्व्हचे अध्यक्ष कुरुश इराणी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, देशातील युवा शक्ती अनेक मोठे बदल घेऊन येत आहे. स्टार्टअप्सध्ये ६० टक्के युवक लहान शहरातून येत आहेत. या स्टार्टअप्समुळे जनतेच्या जीवनातही बदल होत आहे. रोजगार मागण्याऐवजी रोजगार देण्यावर या युवकांचा भर आहे. देशातील सर्वात जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. या युवकांची प्रगती पाहता

'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'चे गुरुवारी उद्घाटन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'चे गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वा. दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत राज्यात एकूण ५११ ग्रामपंचायतीची निवड करण्यात करण्यात आली आहे.  यामध्ये जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, शिरुर, वेल्हे या तालूक्यातील एकूण ३० ग्रामपंचायतीअंतर्गत प्रशिक्षण केंद्राची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदविकाधारकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागरिकांनी नजीकच्या प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव केले आहे.

पायाभूत सुविधांबाबत पुणे देशात 'रोल मॉडेल' व्हावे यासाठी काम करा-केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १७: जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधेबाबत होत असलेली कामे देशाच्या इतर भागासाठी मार्गदर्शक असून अधिकाऱ्यांनी यापुढेही पायाभूत विकासाच्याबाबतीत पुणे देशासाठी 'रोल मॉडेल' राहील यासाठी काम करावे, असे आवाहन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी केले.   जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी  आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,  पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, पिंपरी-चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणेचे संचालक संजय कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. मुरलीधरन म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्यास