टाटा मोटर्स व मोईनी फाउंडेशन च्या वतीने खेड तालुक्यातील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर
दि.२६ (राजगुरूनगर) : टाटा मोटर्स ,चिंचवड .पुणे व मोईनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 25 ऑक्टोबर 2023 रोजी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बॅक्वेट हॉल राजगुरुनगर या ठिकाणी केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात क्लासरूममध्ये एकाधिक बुद्धिमत्ता अध्यापनशास्त्राला प्रोत्साहन देणे या विषयी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करण्यांत आले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील 42 शिक्षक उपस्थित होते.
या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रबोधिनी पुणे येथील बाल मानसशास्त्रात तज्ञ असणारे प्राध्यापक अल्हाद कुलकर्णी व सूरज कायगुढे उपस्थित होते.
या प्रशिक्षणात टाटा मोटर्स चे सीएसआर हेड मा.श्री.रोहित सर, लितेश सर आणि मयुरेश कुलकर्णी सर सहभागी झाले होते व त्यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले व भविष्यातील विविध उपक्रमाची माहिती दिली व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न कसे होतील यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले. मोईनी फाऊडेशन चे पदाधिकारी सुभाष लाटे, इंद्रसेन बांबले, गिरीश माने, अक्षय बोहरा सर, ज्ञानेश्र्वर लाटे, राजू शिंदे , या सर्वांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष लाटे यांनी केले तर आभार आदर्श विद्यालय आंबोलीचे विज्ञान शिक्षक आदलिंगे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा