मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे दि.२३: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या नूतन इमातीचे उद्घाटन करण्यात आले.


कार्यक्रमाला  उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.विकासचंद्र रस्तोगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे,  प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर,  शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, डॉ.गजानन एकबोटे, माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते.


नूतन कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमपणे काम होईल असा विश्वास मंत्री श्री.पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला.


मॉडेल कॉलनी येथील पूर्वीच्या तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून तेथे उच्च शिक्षण संचालनालय कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात