ससून सर्वोपचार रुग्णालयास २५ लाख रुपयांच्या सोनोग्रॉफी मशीनची देणगी

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. १९: ससून सर्वोपचार रुग्णालय येथील क्ष-किरणशास्त्र विभागात स्व. सौ. बदामीबाई जीवराजजी किताबत बाली पुणे यांच्या स्मरणार्थ किताबत कुटुंबाकडून २५ लाख रुपयांचे विप्रो जीई या कंपनीचे बोल्युसॉन पी-८ बीटी-२० सोनोग्राफी मशीन देणगी स्वरुपात देण्यात आले. 


यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, विभागप्रमुख डॉ. शेफाली पवार, पुष्पा प्रकाशजी सोनव्या, दिलीप किताबत, रमेश किताबत, किरण किताबत आदी उपस्थितीत होते.  


अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले, रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाची अत्याधुनिक सेवा मिळावी असा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण अत्याधुनिक उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.


विभागप्रमुख डॉ. पवार यांनी देणगीदारांना  सोनोग्राफी मशीन दिल्याबद्दल धन्यवाद दिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात